Thursday, May 13, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन हरमीत सिंगसोबत घटस्फोटावर शेफाली जरीवालाचा मोठा खुलासा

हरमीत सिंगसोबत घटस्फोटावर शेफाली जरीवालाचा मोठा खुलासा

शेफालीने हरमीत सोबत विभक्त झाल्या नंतर 2014 साली पराग त्यागी याच्याशी विवाह केला.

Related Story

- Advertisement -

बिग बॉस तसेच ‘कांटा लगा’ फेम गर्ल शेफाली जरीवाला हिने एका मुलाखती दरम्यान तिच्या पहिल्या विवाहाबद्दल खळबळजनक खुलासा केला आहे. शेफालीचा विवाह बॉलिवूड मधील प्रसिद्ध सिंगर जोडी मिट ब्रदर्समधील हरमीत सिंग याच्याशी 2004 साली विवाह झाला होता. यांचा संसार जस्त्त काळ टिकू शकला नाही लग्नाच्या तब्बल 9 वर्षा नंतर शेफालीने घटस्फोट घेण्याच्या निर्णय घेतला. मुलाखती दरम्यान शेफालीने आपल्या पूर्व विवाहाबद्दल भावना व्यक्त करत म्हणाली की,” प्रत्येक वैवाहिक जीवनात घरगुती हिंसाचार होत असेल असे नाही. पण बर्‍याचदा मानसिक हिंसाचरला देखील सामोरे जावे लागते आणि तो सूद्धा तितकाच त्रासदायक ठरतो. तसेच शेफाली पुढे म्हणते की, हा विवाह तिझ्यासाठी अत्याचारासारखे होते. तिला दररोज मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत होते. हरमीतसोबत लग्न करून मी खुश नव्हती. मी एक स्वतंत्र स्त्री असल्यामुळे कोणावरही अवलंबून नव्हते. आर्थिक दृष्ट्या सक्षम असल्यामुळे माला त्या नात्यातून बाहेर पडण्याची हिमत मिळाली. मी स्वत: कमवायचे. आपल्या समाजात घटस्फोट हा निषिद्ध मानला जातो . आपण समाजाचा खूप विचार का करतो? आपल्या जीवनात काय योग्य आहे आणि काय नाही हे आपण ठरवले पाहिजे.”

- Advertisement -

शेफालीने हरमीत पासून विभक्त झाल्यानंतर 2014 साली शेफालीने पराग त्यागी याच्याशी विवाह केला. नुकतच शेफाली कलर्स टीव्ही वरील लोकप्रिय रियालिटी शो बिग बॉस मध्ये झळकळी होती.


हे हि वाचा – ऑक्सिजन, बेड्स, रेमडेसिवीर हवय, सोनू सूदला आल्या २८ हजार रिक्वेस्ट

- Advertisement -