घरमनोरंजनघटस्फोटाच्या २४ वर्षांनंतर शेफाली शहा यांचे पती हर्ष छायांनी सोडले मौन

घटस्फोटाच्या २४ वर्षांनंतर शेफाली शहा यांचे पती हर्ष छायांनी सोडले मौन

Subscribe

अभिनेत्री शेफाली शाह हीला आता ओळखीची गरज नाही. आपल्या उत्कृष्ट अभिनय कौशल्यावर शेफाली यांनी छोटा पडदा तर गाजवलाच पण मोठ्या पडद्यावरही बीग बी आमिताभ बच्चन, अनिल कपूर यांसह अनेक मातब्बर कलाकारांबरोबर दमदार अभिनय करत लोकप्रियतेचा कळस गाठला आहे. एवढचं नाही तर ओटीटीवरही दिल्ली क्राईम, ह्यूमन, डार्लिंग्ज, थ्री ऑफ अस या वेब सिरिझ, सिनेमा मधून उत्कृष्ट अभिनय करत वयाच्या पन्नाशीनंतर मनोरंजन विश्वात सेकंड इनिंगला सुरुवात केली आहे.
तर दुसरीकडे करियरचा हा आलेख उंचावत असतानाच शेफाली यांचे खासगी आयुष्य मात्र चढ उतारांनी भरलेले होते. ज्याबद्दल त्यांनी कधीही कुठेही जाहीर वाच्यता केली नाही. पण काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत त्यांचे पूर्व पती हर्ष छाया यांनी त्ंयाच्या शेफालीबरोबरच्या घटस्फोटावर भाष्य केले. त्यामुळे पुन्हा एकदा शेफाली आणि हर्ष चर्चेत आले आहेत.

हिंदी चित्रपटसृष्टीतील दोन सर्वात प्रतिभावान कलाकार हर्ष छाया आणि शेफाली शाह यांनी 1994 मध्ये लग्न केले. ते त्यांच्या थिएटर शो दरम्यान एकमेकांना भेटले आणि प्रेमात पडले आणि त्यांनी लग्नही केले. पण 2000 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. आता हर्षने बंगाली अभिनेत्री सुनीता गुप्तासोबत लग्न केले, तर दुसरीकडे शेफालीने चित्रपट निर्माता विपुल अमृतलाल शाहशी लग्न केले.

- Advertisement -

एका मुलाखतीत हर्ष छायाने आपल्या पहिल्या पत्नी शेफाली शहापासून घटस्फोटाची आठवण करून दिली. इतक्या वर्षांनंतरही, अभिनेत्याने सांगितले की शेफालीसोबत वेगळे होणे हा एक कठीण निर्णय होता परंतु आता ही जुनी गोष्ट आहे आणि त्याच्या आयुष्याचा तो अध्याय आता त्याच्यासाठी बंद झाला आहे.

हर्षने त्याच मुलाखतीत सांगितले की ते आता एकमेकांचे मित्र नाहीत. त्यांच्यात संवादही नाही. यामुळे जर कधी एखाद्या दिवशी ते एकमेकांना भेटले तरी ते अनोळखी झाल्याने त्यांना एकमेकांना बघून अजिबात त्रास होणार नाही.

- Advertisement -

यावर

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -