Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन Shefali Shah : ओटीटी ठरला शेफाली शाहच्या करिअरसाठी Milestone

Shefali Shah : ओटीटी ठरला शेफाली शाहच्या करिअरसाठी Milestone

Subscribe

बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसणे हे प्रत्येक अभिनयप्रेमीचे स्वप्न असते. यासोबतच या उद्योगात येणे ही काही क्षुल्लक गोष्ट नाही. तसेच चित्रपट क्षेत्रात यायचे म्हंटले कि एक आणि अनेक समस्या या समोर येत असतात. अशातच काही लोकांसाठी हा मार्ग खूप सोपा आहे, परंतु दुसरीकडे काही लोक या मार्गावर चालत जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर स्वकष्टाने जातात. शेफाली शाहचीही अशीच कहाणी आहे, जिचे आयुष्य एखाद्या प्रेरणेपेक्षा कमी नाही. चला तर मग जाणून घेऊया अभिनेत्रीच्या आयुष्याशी संबंधित काही रंजक किस्से…

Shefali Shah: "People Now Believe I Have Capability Of Carrying An Entire Film Or Show On My Shoulders"

- Advertisement -

हिंदी चित्रपटांमध्ये छोट्या भूमिकांमधून प्रसिद्धी मिळवलेली शेफाली शाह आज एका मोठ्या स्थानांवर आहे. आज ही अभिनेत्री तिचा वाढदिवस साजरा करत आहे. शेफालीचा जन्म 22 मे 1973 रोजी मुंबई, महाराष्ट्र येथे झाला. आपल्या मुलीच्या जन्मामुळे आई-वडील दोघेही खूप आनंदी होते, म्हणून त्यांनी आपल्या मुलीला अभ्यासासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले. शेफालीने तिचे सुरुवातीचे शिक्षण आर्य विद्या मंदिर सांताक्रूझ, मुंबई येथून केली.

शेफालीच्या व्यावसायिक जीवनाबद्दल बोलायचे तर तिने 1966 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रंगीला’ या चित्रपटाद्वारे तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. यानंतर शेफालीला 1998 मध्ये फिल्मफेअर पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. शेफालीला लहानपणापासूनच अभिनयाची प्रचंड आवड होती, त्यामुळे तिने अभिनयाला आपला व्यवसाय बनवला. तसेच शेफालीची फिल्मी कारकीर्द तितकी खास नव्हती कारण तिला बहुतेक चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका ऑफर झाल्या होत्या. मात्र, ओटीटीने तिचे नशीब बदलले. कसे ते जाणून घेऊया….

- Advertisement -

Shefali Shah recalls living in kholi 'three or four times' the size of a car, says her father would stay in garage at times | Entertainment News,The Indian Express

शेफालीने अनेक लहान अभिनय करून अनेक चित्रपटांमध्ये तिच्या दमदार अभिनयाने सर्वांची वाहवा मिळवली, पण या इंडस्ट्रीत तिला हवी ती ओळख मिळाली नाही. यानंतर शेफालीने ओटीटीचा मार्ग निवडला आणि तिथे तिच्या अभिनयाचे पराक्रम दाखवले. खरंतर शेफालीचा OTT मध्ये जाण्याचा निर्णय योग्य ठरला कारण OTT ने तिला प्रेक्षकांमध्ये ती योग्य ओळख दिली. तसेच तिच्या या भूमिका प्रेक्षकांना आवडू लागल्या. त्यामुळे OTT चा प्लॅटफॉर्म शेफालीला खूप काही देऊन गेला.

7 Strong Characters Of Shefali Shah: The Powerhouse Of Talent

पुढे शेफालीने ‘दिल्ली क्राइम’ आणि ‘अनकही’ सारख्या वेब सीरिजमध्ये हटके परफॉर्मन्स दिले. अशातच तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर शेफालीने दोन लग्न केले आहेत. शेफालीचे पहिले लग्न हर्ष छायासोबत झाले होते. परंतू हे लग्न फार काळ टिकले नाही आणि या दोघांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर तिने चित्रपट दिग्दर्शक विपुल शाह यांच्याशी लग्न केले आणि तिच्या अभिनय कारकिर्दीचा प्रवास अजून पुढे गेला.


हेही वाचा :

सुष्मिता सेन नव्हे तर, ‘ही’ अभिनेत्री होती ‘आर्या’साठी दिग्दर्शकांची पहिली पंसती

- Advertisment -