शहनाज शॉर्टकटच्या माध्यमातून पैसा कमावते… सोना महापात्राचं ट्वीट चर्चेत

बॉलिवूड गायिका सोना महापात्रा नेहमीच तिच्या बेताल वक्तव्यांमुळे चर्चेत असते. यावेळी सोना महापात्राने अभिनेत्री शहनाज गिलविरोधात एक ट्वीट करत तिच्यावर आरोप केले आहेत. सोना महापात्राच्या या ट्वीटवरुन न अनेकजण तिला ट्रोल देखील करत आहेत.

काय आहे प्रकरण?

खरं तर, काही दिवसांपूर्वी अभिनेत्री शहनाज गिल एका इवेंटमध्ये पोहोचली होती. यावेळी अनेकांनी शहनाजला गाणं गाण्यास सांगितले. यादरम्यान, अजानचा आवाज येऊ लागला त्यामुळे शहनाज थांबली. शहनाजच्या या कृत्याचे अनेकजण कौतुक करु लागले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. हाच व्हिडीओ पाहून सोना महापात्राने ट्वीट करत लिहिलं की, शहनाजने व्हिडीओमध्ये जो आदर दाखवला तोच आदर तिने मीटू आरोपी साजिद खानचे समर्थन करताना तिच्या बहिणींबद्दल दाखवायवा हवा होता. असे मला वाटते.

या ट्वीटनंतर सोना महापात्राने आणखी एक ट्वीट केलं. ज्यात तिने लिहिलंय की, “प्रिय ट्रोलर्स जॅकलिनसारख्या दुसर्‍या अभिनेत्रीसाठी उभे राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. मला माहित नाही की शहनाजची खास प्रतिभा काय आहे? सध्याच्या घडीला तिने फक्त एका रियालिटी शो शिवाय काहीच केले नाही. मी त्या महिलांना चांगलं ओळखते. ज्या शॉर्टकटच्या माध्यमातून चांगला पैसा कमावतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shehnaaz Gill (@shehnaazgill)

दरम्यान, सोना महापात्राच्या या ट्वीटमुळे तिला अनेकजण ट्रोल करु लागले आहेत. शहनाजच्या नावावर सोना महापात्रा प्रसिद्धी मिळवत असल्याचं देखील म्हटलं जात आहे.

 


हेही वाचा :

किंग खानचा ‘जवान’मधील लूक व्हायरल? फोटो पाहून चाहते घायाळ