बिग बॉस सीझन १३ विजेता अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचा काल, गुरुवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे घोषित केले (sidharth shukla death). यामुळे संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीसह हिंदी टेलिव्हिजन इंडट्रीमध्ये शोककाळ पसरली आहे. सिद्धार्थच्या अचानक एक्झिटमुळे चाहत्यांसह इतर कलाकारांचा धक्का बसला आहे. आज मुंबईतील ओशिवरामध्ये सिद्धार्थ शुक्लावर अंत्यसंस्कार (sidharth shukla funeral) करण्यात येणार आहे. सिद्धार्थच्या जाण्यामुळे त्याची जवळची मैत्रिण शेहनाज गिलला (shehnaz gill) मोठा मानसिक धक्का बसला आहे. आता शेहनाज सिद्धार्थला शेटाचा निरोप देण्यासाठी ओशिवरामध्ये पोहोचली आहे. यादरम्यानचे तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सिद्धार्थच्या जाण्याने शेहनाजला किती मोठा धक्का बसला आहे, हे व्हिडिओ आणि फोटोमध्येच दिसत आहे. शेहनाजची अवस्था खूप बिघडली आहे. शेहनाज बेशुद्ध अवस्थेत असून रडरडत शेहनाज आता सिद्धार्थच्या अंत्यसंस्कारासाठी पोहोचली आहे. तिच्यासोबत तिचा भाऊ शेहबाज तिला आधार देताना दिसत आहे. दरम्यान माध्यमांच्या काही वृत्तानुसार, शेहनाज गिल असताचा सिद्धार्थने अखेरचा श्वास घेतला. त्याने शेहनाजच्या कुशीत जीव सोडला असल्याचे म्हटले जात आहे.
Shehnaaz Gill at the funeral ground😞
–#shehnaazgill #sidharthshukla #sidnaaz #sidharthshuklafuneral #ripsidharthshukla #koimoi pic.twitter.com/hp6QHvNH6Y— Koimoi.com (@Koimoi) September 3, 2021
बिग बॉस सीझन १३ मध्ये सिद्धार्थ आणि शेहनाज एकत्र भेटले होते. बिग बॉसच्या घरात दोघांची खूप चांगली बॉन्डिंग झाली. ही बॉन्डिंग फक्त बिग बॉसच्या घरापुरती मर्यादित राहिली नाही. बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यानंतरही सिद्धार्थ आणि शेहनाज एकत्र दिसले. ‘भुला दुंगा’ आणि ‘शोना शोना’ या गाण्यामध्ये पुन्हा त्यांची केमस्ट्री पाहायला मिळाली. परंतु आता त्यांची ही क्युटी जोडी सिद्धार्थच्या अचानक जाण्याने तुडली आहे. माध्यमांनी शेहनाजसोबत बातचित करण्याचा प्रयत्न केला, पण तिने तोंडातून एकही शब्द काढला नाही. शेहनाज सध्या काहीही न बोलण्याचा अवस्थेत आहे.
हेही वाचा – Sidharth Shukla death-सिद्धार्थच्या मृत्यूचं गूढ वाढलं,पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मृत्यूचे नेमके कारण अस्पष्ट