घरमनोरंजन‘मराठी चित्रपटसृष्टी ही प्रचंड धोक्यात’, प्राईम टाईम मुद्द्यावरील अक्षय वाघमारेची पोस्ट चर्चेत

‘मराठी चित्रपटसृष्टी ही प्रचंड धोक्यात’, प्राईम टाईम मुद्द्यावरील अक्षय वाघमारेची पोस्ट चर्चेत

Subscribe

सध्या भारतीय सिनेसृष्टीत हिंदी विरुद्ध साऊथ असा वाद सुरु झालाय. हिंदी भाषेवरून अनेक अभिनेते सोशल मीडियावर व्यक्त होत आहे. हा वाद आता थांबत नाही तोवर मराठीविरुद्ध हिंदी असा वाद सुरु झालाय. बॉक्स ऑफिसवर नुकताच शेर शिवराज हा मराठी चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडूनही पसंतीची पोच पावती मिळाली. या चित्रपटाचे अनेक शो हाऊसफुल सुरु आहेत. मात्र अनेक ठिकाणी मात्र या सिनेमाला प्राइम टाईम शोज मिळत नसल्याची तक्रार आहे. याच मुद्द्यावरून ‘शेर शिवराज’ फेम अभिनेता अक्षय वाघमारेने एक भली मोठी पोस्ट केली आहे. ही पोस्ट आता सोशल मीडिया पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे.

जाहीर निषेध अशा आशयाच्या फोटोसह करत अक्षयने ही पोस्ट शेअर केली आहे. ‘प्राईम टाइम्स हे हिंदी चित्रपटांना प्राधान्याने दिले जातात आणि त्या वेळेला तिथे मराठी चित्रपट नसतो. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टी ही प्रचंड प्रमाणात धोक्यात आलेली आहे.’ आल्याचे म्हणत अक्षयने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

अक्षय वाघमारेची पोस्ट नेमकी का आहे?

‘जाहीर निषेध! पोस्ट कॅप्शन वाचा’, असे म्हणत अक्षयने सोशल मीडियावर एक मोठी पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिले आहे की, ‘नमस्कार पोस्ट मोठी आहे, पण अत्यंत महत्वाची आहे. मराठी चित्रपट आणि प्राईम टाईम.. मुळात महाराष्ट्रात राहून आपल्या मातृभाषेच्या चित्रपटासाठी झगडावे लागत आहे यासारखे दुसरे दुर्दैव नाही. याविषयी यापूर्वी देखील अनेकदा या विषयी बोलले गेले आहे. पण, पुढे काहीच साध्य झाले नाही. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची महती सांगणारा ऐतिहासिक चित्रपट शेर शिवराज हा गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झाला. फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड आणि आता शेर शिवराज असे ऐतिहासिक चित्रपट बनवण्यामागे दिग्दर्शक दिगपाल लांजेकर यांचा एकच उद्देश होता की, महाराजांचा इतिहास सर्व लोकांपर्यंत पोहोचायला हवा, नवीन पिढीला स्वराज्य घडवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कळावा.’

त्याने पुढे म्हटले की, ‘स्वराज्याची स्थापना ते परकीयांचे आक्रमण या आणि अनेक बाबी या चित्रपटांद्वारे मांडल्या गेल्या आहेत आणि मराठी जनतेने उत्स्फुर्तपणे या सर्व चित्रपटांना प्रतिसाद दिला. आता सुद्धा महाराष्ट्रातील जनता शेर शिवराज हा चित्रपट पाहू इच्छिते. पण, तरी बघू शकत नाही किंवा त्यांना बघू दिला जात नाही, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे शो चे वेळापत्रक अर्थात शो टाइम्स. सगळे प्राईम टाइम्स हे हिंदी चित्रपटांना प्राधान्याने दिले जातात आणि त्या वेळेला तिथे मराठी चित्रपट नसतो. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टी ही प्रचंड प्रमाणात धोक्यात आलेली आहे.

- Advertisement -

चित्रपटाच्या निर्मितीमागे असंख्य हात लागलेले असतात या चित्रपटसृष्टीत अनेक लोकांचे उत्पन्न अवलंबून आहेत या सगळ्याचा विचार कोण करणार?? आपल्याच राज्यात राहून आपल्या मराठी भाषेची गळचेपी होत असेल, तर या संदर्भात आवाज उठवायला नको का?? जी व्यवस्था हे सगळं बघत आहेत त्यांनी या विषयी काहीतरी धोरण अवलंबनार आहेत की नाही? नाही तर इथून पुढे मराठी चित्रपट निर्मिती करतांना निर्माते देखील 10 वेळा विचार करतील आणि अनेक लोक बेरोजगार होतील.’ असही अक्षय म्हणाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Waghmare (@akshayswaghmare)

‘मराठी माणसाने म्हणजे सन्मानीय दादा साहेब फाळके यांनी हि चित्रपटसृष्टी निर्माण केली आणि याच राज्यात मराठी चित्रपटांचे असे हाल होत आहेत. जर निर्मात्यांचे अशा प्रकारे नुकसान होणार असेल, तर आम्ही कलाकारांनी देखील का काम करावे हा पण एक प्रश्न आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्रपटाची अशी अवस्था महाराष्ट्रात आहे, तर इतर चित्रपटांबद्दल बद्दल काय बोलणार??? बस झाला यापेक्षा जास्त सहन करणे आता शक्य नाही … मातृभाषेचा सन्मान महाराष्ट्रात झालाच पाहिजे…प्राइम टाइम आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे…’, असा संताप या पोस्टमध्ये अक्षयने व्यक्त केला आहे.

फर्जंद, फत्तेशिकस्त आणि पावनखिंड या तीन चित्रपटांनंतर शेर शिवराज हा शिवराज अष्टकातील चौथा चित्रपट नुकताच रिलीज झाला. यात छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या अफजल खानाच्या वधाची गोष्ट दाखवण्यात आली आहे. बॉक्स ऑफिसवर देखील ‘शेर शिवराज’ला चांगला प्रतिसाद मिळतोय. मात्र चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद असतानाही मुंबईत प्राइम टाइम शोज मिळत नसल्याचे दिसतेय. त्यामुळे मराठी सिनेसृष्टीकडून तीव्र नाराजी व्यक्त होतेय.


Ram Setu FIRST look: अक्षय कुमारचा ‘राम सेतू’ दिवाळीच्या मुहूर्तावर होणार रिलीज; पोस्टर शेअर करत दिली माहिती

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -