Pornography Case: शर्लिन चोप्राचा अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला, राज कुंद्राविरोधात देणार जबाब?

Sherlyn Chopra denied anticipatory bail by Mumbai court in porn racket case
Pornography Case: शर्लिन चोप्राचा अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला, राज कुंद्राविरोधात देणार जबाब?

पॉर्न फिल्मप्रकरणी आता मुंबई सत्र न्यायालयाने अभिनेत्री शर्लिन चोप्राचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. कोर्टात पोलिसांनी सांगितले की, पॉर्न रॅकेट प्रकरणात शर्लिन चोप्रा साक्षीदार आहे. त्यामुळे याप्रकरणात तिला पोलिसांनी समन्स बजावला आहे.

पॉर्न फिल्मप्रकरणी बिझनेस मॅन राज कुंद्राला यापूर्वी अटक केली आहे. पोलिसांनी याप्रकरणात शर्लिन चोप्राचा जबाब नोंद करण्यासाठी समन्स केला आहे. तेव्हापासून शर्लिनच्या अटकेची टांगती तलावर लटकत आहे. यामुळे शर्लिनने न्यायालयात जामीन मिळण्याचा अर्ज केला होता. आज यावर सुनावणी होऊन न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आहे. शर्लिनच्या वकीलाने न्यायालयात सांगितले की, अभिनेत्रीला अटक करण्याची भिती नसून ती स्वतःचा बचाव करत आहे.

दरम्यान मुंबईच्या क्राईम ब्रांचच्या प्रॉपर्टी सेलने शर्लिन चोप्रासोबत गहना वशिष्ठाला समन्स बजावला आहे. दोन्ही अभिनेत्री पोलिसांसमोर अजून हजर झाल्या नसून दोघींनी अजून काही दिवसांची सवलत मागितली आहे. जरी शर्लिन चोप्रा पोलीस चौकशीला समोर जात नसली तरी माध्यमांवर शर्लिन राज कुंद्रावर गंभीर आरोप करत आहे. राज कुंद्राने पॉर्न फिल्मच्या व्यवसायात घुसवले आहे, असा दावा शर्लिनने केला आहे. पहिल्यांदा एका रोलची ऑफर केली त्यानंतर अश्लील कंटेंट बनवण्यास सांगितले, असे शर्लिनने सांगितले.


हेही वाचा – happy birthday sanjay dutt: ‘केजीएफ चॅप्टर २’ मधील संजूबाबाचा खतरनाक लूक समोर