सिद्धार्थ मल्होत्राचा ‘शेरशाह’ अडचणीत!

सिद्धार्थ मल्होत्राचा 'शेरशाह' अडचणीत!

कारगिल युद्धातील खरा योद्धा कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या आयुष्यावर आधारलेला शेरशाह या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत असून कियारा आडवाणी विक्रम बत्रा यांच्या प्रेयसी म्हणजेच डिंपल चीमा यांच्या भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विष्णुवर्धन यांनी केले असून या चित्रपटाला लोकांनी पसंती दिली. यामधील कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या शौर्य गाथा पाहून प्रेक्षकांचे डोळे पाणावले. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतर बऱ्याच महिन्यांनी आता अडचणीत सापडल्याचे दिसतंय.

असे सांगितले जात आहे की, फराज अश्रफ नावाच्या एका काश्मिरी पत्रकाराने म्हटले आहे की, त्याचे आयुष्य संकटात आहे, कारण ‘शेरशाह’ चित्रपट निर्मात्यांनी त्याच्या कारच्या नंबर प्लेटचा वापर चित्रपटात करत त्याची कार दहशतवाद्यांची असल्याचे दाखवले आहे. फराज यांनी त्यांची कार व चित्रपटात दाखवण्यात आलेल्या कारचे फोटो शेअर केले आहेत. या दोन्ही कारची नंबर प्लेट सारखीच आहे. पत्रकाराने दावा केला आहे की, या कारणामुळे त्याला आणि त्याच्या कुटुंबाला धमकी देखील मिळत आहे.

या सर्व प्रकारानंतर काश्मिरी पत्रकाराने असे सांगितले की, चित्रपट तयार करणाऱ्यांनी माझ्या नोंदणीकृत नंबर कॉपी केला व चित्रपटात त्याचा वापर केला. मी निर्माता कंपनीविरोधात याचिका दाखल करत आहे. फराज याने यासंदर्भात एक ट्विट देखील केले आहे. त्याने असे ट्विट केले, ‘मला व माझ्या कुटुंबाला धमकी दिली जात आहे. मी कारमधून प्रवास करु शकत नाही, मला सुरक्षितही वाटत नाही. मी कोणत्याही चित्रपट निर्माता कंपनीला माझ्या कारचा नोंदणीकृत नंबर वापरण्याची परवानगी दिलेली नाही. त्यामुळे मी धर्मा मुव्ही विरोधात लढणार आहे’


अभिनेता मनोज बाजपेयीच्या वडिलांचे ८३ व्या वर्षी निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास