घरमनोरंजनShershaah : मुलगा कॅप्टन विक्रम बत्रा शहीद होतानाचा सीन पाहून आई-वडीलांचे डोळे...

Shershaah : मुलगा कॅप्टन विक्रम बत्रा शहीद होतानाचा सीन पाहून आई-वडीलांचे डोळे पाणावले

Subscribe

बॉलिवूडमधील बहुचर्चित शेरशाह या चित्रपटाने साऱ्यांची मनं जिंकली आहे. १२ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. यातील अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणीच्या अभिनयाचं सर्व कौतुक होत आहे. इतकचं नाही तर सिद्धार्थच्या करियरमधील शेरशाह हा जबरदस्त चित्रपट असल्याचे म्हटले जात आहे. कारगिरच्या युद्धात शहीद झालेल्या कॅप्टर विक्रम बत्रा यांच्या आयुष्य़ावर आधारित आहे. कॅप्टन विक्रम बत्रा हे वयाच्या 25व्या वर्षी कारगिलच्या युद्धात शहिद झाले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांकडूनही पसंती मिळत आहे. या चित्रपटातील काही क्षण पाहून प्रेक्षकांना अश्रू अनावर झालेत. यावेळी कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या आई वडिलांनाही मुलाला शहीद होतानाचा सीन पाहून अश्रू अनावर झाले होते.

एका मुलाखतीत कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या वडिलांनी सांगितले की, ११९७साली प्रदर्शित झालेला बॉर्डर चित्रपट विक्रम यांनी जवळपास ८ वेळा पाहिला होता. विक्रम मोठे देशभक्त होते. बॉर्डर चित्रपटाचा परिणाम त्यांच्यावर झाला होता. त्यामुळे त्यांना सैनिकाचे आयुष्य आवडले.

- Advertisement -

शेरशाहमधील कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या शहीद होतानाच्या सीनवर म्हणाले की, एका लपून बसलेल्या पाकिस्तानी सैनिकाचे विक्रम यांच्यावर लक्ष होते.त्यानंतर त्याने विक्रमला ३ ते ४ गोळ्या झाडल्या. यामुळे विक्रम रक्ताच्या थारोळ्यात दुर्गा माता की जय़ म्हणत खाली कोसळला आणि शहीद झाला. आमच्यासाठी हा क्षण खूपच भावनिक होता. ‘शेरशाह’ या चित्रपटात सिद्धार्ध मल्होत्रा आणि कियारा आडवाणीने मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटात विक्रम बत्रा यांचा संपूर्ण प्रवास दाखवण्यात आला आहे.


पुण्यातून देशातील २१ शहरांसाठी २० ऑगस्टपासून विमानसेवा होणार सुरु


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -