फक्त 40 दिवस एकत्र होतो, ‘शेरशाह’च्या लेखकाने केला विक्रम-डिंपल यांच्या लव्हस्टोरीचा उलगडा

आमच्या आयुष्यातील हे चाळीस दिवस खूप महत्वाचे व सुंदर होते.

shershah caption vikram batra love story
फक्त 40 दिवस एकत्र होतो, 'शेरशाह'च्या लेखकाने केला विक्रम-डिंपल यांच्या लव्हस्टोरीचा उलगडा

बॉलीवूडमधील बहुचर्चित सिनेमा ‘शेगशाह’ने (Shershah)साऱ्यांची मनं जिंकली. या चित्रपटातील अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (siddhartah malhotra) आणि कियारा आडवाणीच्या (kiara advani)अभिनयाचं सर्व स्तरातून कौतुक होतं आहे. कारगिलच्या युद्धात शहीद झालेल्या कॅप्टर विक्रम बत्रा (caption vikram batra)यांच्या आयुष्य़ावर आधारित आहे. कॅप्टन विक्रम बत्रा हे वयाच्या २५ व्या वर्षी कारगिलच्या युद्धात शहिद झाले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांकडूनही पसंती मिळत आहे. अभिनेत्री कियारा अडवाणीने विक्रम बत्रा यांची गर्लफ्रेंड डिंपल चीमा यांची भूमिका चोखरित्या बजावली आहे. मात्र या सिनेमाचे लेखन करण्याकरीता संदीप श्रीवास्तव यांना प्रचंड रिसर्च करावी लागली होती. विक्रम यांच्या आयुष्याशी निगडीत सर्व व्यक्तीसोबत त्यांनी या रिसर्चदरम्यान संपर्क साधला. याचदरम्यान त्यांनी डिंपल चीमा सोबत देखील संवाद साधला आणि त्यांच्या आणि विक्रम बत्राच्या लव्ह स्टोरी बद्दल माहिती जाणून घेतली. यावेळी डिंपल यांनी उलगडा केला की माझी आणि विक्रम यांची लव्ह स्टोरी फक्त 40 दिवस चालली होती.(shershah caption vikram batra love story )

संदीप श्रीवास्तव यांनी एका इंग्रजी वेबसाईटला दिलेल्या मुलाखती दरम्यान डिंपल यांच्या भेटीचा उलगडा केला आहे. संदीप म्हणाले, “डिंपल यांना जेव्हा मी भेटलो तेव्हा त्यांनी मला संपूर्ण माहिती दिली त्या म्हणाल्या की कॅप्टन विक्रम बत्रा आणि मी एकमेकांना चार वर्षापासून ओळखतो. मात्र आम्ही फक्त चाळीस दिवस एकमेकांसोबत वेळ घालवू शकलो. आमच्या आयुष्यातील हे चाळीस दिवस खूप महत्वाचे व सुंदर होते.”

कियाराने ज्या प्रकारे डिंपल यांची भूमिका साकारली आहे हे पाहून सर्वांच्या डोळ्यात अश्रू आले. सर्व प्रेक्षकवर्ग त्या भूमिकेशी जोडला गेला आहे. संदीप पूढे म्हणाले की, डिंपल कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या आयुष्यातील महत्वपूर्ण भाग आहे. आम्ही त्यांच्या व्यक्तीगत आयुष्यात आणि सैनिकी आयुष्यातील जीवनाचे चित्रीकरण करताना संतुलन राखण्यात यशस्वी ठरलो आहोत.

‘शेरशाह’ चित्रपटाचे दिग्दर्शन विष्णुवर्धनने केले असून निर्मिती करण जोहरची कंपनी धर्मा प्रोडक्शन केली आहे. करण जोहरचा हा अॅमेझोन प्राइमसोबतचा पहिलाच प्रोजेक्ट आहे. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी व्यतिरिक्त शिव पंडित, राज अर्जुन, प्रणय पचौरी, हिमांशु अशोक मल्होत्रा, निकितिन धीर, अंकिता गोराया, अनिल चरणजीत, साहिल वैद्य, शाताफ फिगर आणि पवन चोप्रा प्रमुख भूमिकेत आहेत.


हे हि वाचा – mission impossible 7: शूटींगदरम्यान टॉम क्रूजच्या BMW कारची झाली चोरी