Farhan Akhtarच्या वाढदिवसाला Shibani शेअर केला दोघांचा स्टनिंग फोटो, म्हणाली…

शिबानी मागच्या तीन वर्षांपासून फरहानचा वाढदिवस साजरा करत आहे. हे वर्ष तर दोघांसाठी आणखी खास असणार आहे. शिबानीने फरहानच्या वाढदिवसाला दोघांचे काही स्टनिंग फोटो शेअर करत त्याला अनोख्या अंदाजात शुभेच्छा दिल्या.

Shibani dandekar share stunning photos on Farhan Akhtar birthday
Farhan Akhtarच्या वाढदिवसाला Shibani शेअर केला दोघांचा स्टनिंग फोटो, म्हणाली...

अभिनेता,दिग्दर्शक आणि निर्माता फरफान अख्तरने ( Farhan Akhtar)  नुकताच त्याचा ४८ वा वाढदिवस साजरा केला. यंदाचा वाढदिवस फरहानसाठी खास असणार आहे. कारण पुढच्या काही दिवसात तो शिबानी दांडेकर (Shibani Dakndekar )  सोबत लग्न करणार आहे. शिबानी मागच्या तीन वर्षांपासून फरहानचा वाढदिवस साजरा करत आहे. हे वर्ष तर दोघांसाठी आणखी खास असणार आहे. शिबानीने फरहानच्या वाढदिवसाला दोघांचे काही स्टनिंग फोटो शेअर करत त्याला अनोख्या अंदाजात शुभेच्छा दिल्या.

शिबानीने तिच्या पोस्टमध्ये म्हटले की, ‘My Foo येणारे वर्ष तुझ्यासाठी आणखी बेस्ट असेल. माझ्याकडून तुला खूप सारे प्रेम वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा’. या छोट्याश्या लाईन्समधून शिबानीने फरहानवर असलेले तिचे प्रेम व्यक्त करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शिबानीने शेअर केलल्या स्टनिंग फोटोविषयी म्हणायचे झाले तर, शिबानीने यात थाई स्लिट फुल स्लीव्स ड्रेस घातला असून पर्ल हूप्स आणि ओपन हेअर्सने शिबानीच्या लुकला चार चाँद लावले आहेत. फुटवेअर्समध्ये शिबानीने ब्लॅक कलरच्या हाय हिल्स घातल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shibani Dandekar (@shibanidandekar)

तर फरहान पूर्णपणे ब्लॅक लुकमध्ये दिसत आहे. दोघांनी ब्लॅक अँड व्हाइट बॅक ग्राऊंडमध्ये कमाल फोटोशूट केले. दोघांच्या फोटोंना त्यांच्या चाहत्यांनी पसंती देत फरहानला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि दोघांविषयी प्रेम व्यक्त केले आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, शिबानी आणि फरहान मार्च महिन्यात लग्न करणार आहेत. दोघांनी शाही विवाह सोहळ्याचे प्लॅनिंग केले होते मात्र कोरोनामुळे त्यांना प्लॅन कॅन्सल करावा लागला. शिबानी आणि फरहान जवळचे मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये लग्न करणार आहेत.


हेही वाचा – Farhan Akhtar Shibani Dandekar Wedding: फरहान – शिबानी मार्चमध्ये विवाह!