Shilpa Shetty पुन्हा वादाच्या भोवऱ्यात ; बहीण शमिता आणि आई सुनंदा यांना फसवणुकीप्रकरणी समन्स

अभिनेत्री शिल्पा शेट्टी पती राज कुंद्राच्या पॉर्नोग्राफी प्रकरणानंतर पुन्हा एकदा वाद्याच्या भोवऱ्यात अडकली आहे. शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) , तिची बहीण शमिता शेट्टी (Shamita Shetty) आणि आई सुनंदा शेट्टी (Sunanda Shetty) यांच्यावर 21 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Shilpa Shetty again in the midst of controversy; Summons to sister Shamita and mother Sunanda for cheating
Shilpa Shetty पुन्हा वादाच्या भोवऱ्यात ; बहीण शमिता आणि आई सुनंदा यांना फसवणुकीप्रकरणी समन्स

अभिनेत्री शिल्पा शेट्टी पती राज कुंद्राच्या पॉर्नोग्राफी प्रकरणानंतर पुन्हा एकदा वाद्याच्या भोवऱ्यात अडकली आहे. शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) , तिची बहीण शमिता शेट्टी (Shamita Shetty) आणि आई सुनंदा शेट्टी (Sunanda Shetty) यांच्यावर 21 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध अंधेरीच्या न्यायदंडाधिकारी न्यायालयाने समन्स बजावण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका व्यावसायिकाने त्याच्याविरुद्ध जुहू पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

नेमके काय आहेत आरोप?

शिल्पा शेट्टी, शमिता शेट्टी आणि सुनंदा शेट्टी यांच्यावर 21 लाखांचे कर्ज न फेडल्याचा आरोप आहे. हे प्रकरण न्यायालयात सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिल्पा आणि शमिताचे वडील सुरेंद्र शेट्टी यांनी 21 लाखांचे कर्ज घेतले होते. या प्रकरणी परहाद आमरा नावाच्या व्यावसायिकाने जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. परहाद आमरा हे ऑटो मोबाईल एजन्सीचे मालक आहेत. सुरेंद्र शेट्टी यांनी 2015 मध्ये त्यांच्याकडून कर्ज घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे. हे कर्ज त्यांना जानेवारी 2017 पर्यंत फेडायचे होते.

आमराच्या म्हणण्यानुसार, आता शिल्पा, शमिता आणि त्यांची आई सुनंदा हे कर्ज फेडण्यास नकार देत आहेत. न्यायालयाने अभिनेत्री शिल्पा, शमिता आणि सुनंदा यांच्याविरोधात समन्स जारी केले असून, त्यांना 28 फेब्रुवारीला हजर राहण्यास सांगितले आहे.


हे ही वाचा – नर्मदा खोरे प्रकल्पाचा बोगदा कोसळून अपघात; ७ जणांना वाचवण्यात यश, अद्याप काही बेपत्ता