Wednesday, June 23, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन 'सुपर डान्सर 4' च्या परिवारासोबत शिल्पा शेट्टीने साजरा केला वाढदिवस

‘सुपर डान्सर 4’ च्या परिवारासोबत शिल्पा शेट्टीने साजरा केला वाढदिवस

भागात प्रेक्षक स्पर्धकांना आपल्या ‘नवीन’ गुरु समवेत वेगळी डान्स स्टाइल आजमावताना दिसतील. शिवाय, शिल्पा शेट्टी कुंद्राचा वाढदिवस साजरा करण्याचीही पूर्ण तयारी आहे

Related Story

- Advertisement -

‘बाजीगर’ या चित्रपटाने आपल्या करियरची सुरुवात करणारी अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने अगदी कमी वेळातच बॉलीवूडमध्ये आपली जागा निर्माण केली. आणि बघता बघता तिची गणना बॉलीवूड मधील अनेक तगडया अभिनेत्री बरोबर होऊ लागली. इंडस्ट्री मध्ये आपलं नाव कामावणारी अभिनेत्री शिल्पा शेट्टी आज एक डांस रियलिटी शो ‘सुपर डांसर 4’ मध्ये जज च्या खुर्चीत विराजमान आहे. आज शिल्पा 46 वर्षाची झाली असून तिचा आज वाढदिवस आहे आणि हा दिवस शिल्पाने सुपर डान्सर सत्र 4 च्या परिवारासोबत साजरा केला. सुपर डान्सर सत्र 4 मध्ये या वीकएंडला असणार आहे दिमाखदार सेलिब्रेशन. येत्या भागात ‘गुरु-शिष्य की अदलाबदली’ हे थीम आहे, त्यामुळे या भागात प्रेक्षक स्पर्धकांना आपल्या ‘नवीन’ गुरु समवेत वेगळी डान्स स्टाइल आजमावताना दिसतील. शिवाय, शिल्पा शेट्टी कुंद्राचा वाढदिवस साजरा करण्याचीही पूर्ण तयारी आहे. शूटिंग दरम्यान हे समजल्यानंतर शिल्पाला सुखद आश्चर्याचा धक्काच बसला होता.

- Advertisement -

शिल्पा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते अनेकदा ती चहत्यांसोबत आपल्या करियर तसेच व्यक्तीगत जीवनाशी निगडीत गोष्टी शेअर करते. शिपलाच्या प्रत्येक पोस्ट वर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करताना दिसतात. शिल्पाचा धमकेदार डान्स बघण्यसाठी पाहा सुपर डान्सर सत्र 4 या शनिवारी आणि रविवारी रात्री 8:00 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!


हे हि वाचा – ‘फुलाला सुगंध मातीचा’मालिकेवर LGBTQIA+ कम्युनिटीने घेतला आक्षेप

- Advertisement -