घरताज्या घडामोडीViral Video: Shilpa Shettyची अतरंगी हेअरस्टाईल पाहून याडं लागेल

Viral Video: Shilpa Shettyची अतरंगी हेअरस्टाईल पाहून याडं लागेल

Subscribe

बॉलिवूड इंडस्ट्रीची ग्लॅमरस डॉल शिल्पा शेट्टी आपल्या प्रत्येक लूक्सने चाहत्यांना प्रेरित करत असते. शिल्पाचा फॅशन सेंस आणि तिचा स्टायलिशन आउटफिट्स सगळ्यांना खूप आवडत असतो. शिल्पा नेहमी आपल्या लूक्ससोबत एक्सपेरिमंट (प्रयोग) करत असते. आता शिल्पाने खास मेकओव्हर केला आहे, ज्यानंतर ती चांगलीच चर्चेत आली आहे.

अलीकडेच शिल्पाने आपल्या इन्स्टाग्रामवर अकाउंटवर एक रील व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत शिल्पा जिममध्ये दिसत आहे. परंतु वर्कआउट सुरू करण्यापूर्वी शिल्पा आपले केस व्यवस्थित करून नवा हेअरकट चाहत्यांना दाखवत आहे. व्हिडिओमध्ये पाहू शकता की, शिल्पाने डोक्याच्या खालच्या बाजूचे केस कापले आहेत. ही नवी हेअरस्टाईल दाखवून झाल्यानंतर शिल्पा एक्सरसाईज करताना दिसत आहे.

- Advertisement -

शिल्पाने हा व्हिडिओ शेअर करत एक खास कॅप्शन लिहिले आहे. शिल्पाने लिहिले की, ‘तुम्ही रिस्क शिवाय आणि आपल्या कंफर्ट जोनमधून बाहेर आल्याशिवाय प्रत्येक दिवस राहू शकत नाही. मग तो अंडरकट बज कट असो किंवा माझे नवीन एरोबिक वर्कआउट ‘ट्रायबल स्क्वॅट्स’. शिल्पाने कॅप्शनमध्ये आपल्या नवीन हेअर स्टाईलला अंडरकट बज कट असल्याचे सांगितले आहे.

काही चाहत्यांना शिल्पाचा हा नवा अंडरकट बज कट हेअरस्टाईल खूप आवडली आहे. हे चाहते शिल्पाच्या या व्हिडिओवर फायर इमोजीसोबत आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. तर काही चाहत्यांचा शिल्पाचा हा कट आवडला नाही आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Bigg Boss 15: फ्लोरिडाच्या विमानतळावरील डिझाईन बिग बॉसनं केलं कॉपी!


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -