घर मनोरंजन शिल्पा शेट्टी - कठीण प्रसंगात तुमचा विश्वास कायम ठेवा

शिल्पा शेट्टी – कठीण प्रसंगात तुमचा विश्वास कायम ठेवा

Subscribe

– हर्षदा वेदपाठक

शिल्पा शेट्टी आता लवकरच रुपेरी पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सुखी या हलक्याफुलक्या चित्रपटात ती सुखप्रीतच्या भूमिकेत दिसेल. गृहीणी असलेली सुखप्रीत एक स्त्री म्हणून आपली ओळख कशी परत मिळवते त्याचीच ही कथा… यानिमित्ताने या चित्रपटाविषयीची तिची मते आणि तिने आयुष्यात आजवर आत्मसात केलेले काही धडे इत्यादी प्रश्नांवर आम्ही शिल्पाशी संवाद साधला.

- Advertisement -

व्यावसायिक आघाडीवर तुला किती ‘सुखी’ वाटत आहे?

मी खूपच सुखी आहे कारण मला वाटते की जे होते ते चांगल्यासाठीच होते. मी नेहमीच अतिशय आनंदी मनःस्थितीत असते.

- Advertisement -

सुरुवातीला तू ही भूमिका स्विकारायला तयार नव्हतीस ना?

हो, हे बरोबर आहे. मी इतर काही अभिनेत्रींची नावेही या भूमिकेसाठी सुचवली होती. पण सोनल (जोशी) आणि विक्रमच्या मनात मात्र दुसरा कोणताच कलाकार नव्हता. या कथेसाठी त्यांना अशा कोणाची तरी गरज आहे जी तिचे व्यक्तिरेखा वीस वर्षांच्या अंतराने साकारु शकते. हा चित्रपट माझ्यासाठीच बनवला आहे असे वाटते. मी ही भूमिका जगले आहे. मी सुखीबरोबर जोडले गेले आहे असे मला वाटते.

तू स्वतः एक करीयर वुमन, आई आणि मुलगी आहेस, तसेच फीटनेस फ्रीकही आहेस.. आजच्या स्त्रीला तू काय कानमंत्र देशील?

मी माझ्या कुटुंबासाठी सतत काही करत असले, तरी कधीतरी मला वाटते की, मी कमी पडत आहे. पालकांसाठी कोणताही मार्ग परिपूर्ण नसतो. आनंदी रहाण्याचाही कोणताच मार्ग परिपूर्ण नसतो. माझ्यासाठी, आनंद किंवा समाधान हे शारीरीक तंदुरुस्तीतून येतो. कारण ती तुम्हाला मानसिकरीत्या चांगल्या स्थितीत ठेवते. तुमचे मन तुमच्या शरीरापेक्षा जास्त ताकदवान असते. त्यामुळे शारीरीक आणि मानसिक अशी दुहेरी तंदुरुस्ती असेल तर तुम्हाला विविध क्षेत्रांत चांगली कामगिरी करण्यास मदत होते. मी योगा करते. कामासाठी बाहेर जात असताना, वाटेतही ओटीटी वर काहीतरी बघत असते – मी अगदी प्रवास करतानाही निष्कीर्य बसत नाही. माझा काही विशिष्ट उर्जांवर विश्वास आहे. मला वाटते की आपल्या विचारांची आणि शब्दांची उर्जा आपल्या सभोवतालच्या वातावरणात प्रवेश करते. उदाहरणार्थ, तिथे ते पाण्याचे भांडे आहे. जर आपण नकारात्मक गोष्टींवर चर्चा करत असलो किंवा कोणाबद्दल वाईट बोलत असलो, तर ते पाणी प्यायल्याने माझ्यामध्ये नकारात्मक उर्जा येईल, असे मला खात्रीने वाटते. मी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून सगळीकडे जाते आणि प्रत्येकाला हे दिसू शकते.

तू नकारात्मक उर्जा कशी दूर करतेस?

मला काही लोकांबरोबर काम करताना त्यांच्याकडून नकारात्मक उर्जा जाणवते. मी फक्त माझे काम करते आणि तेथून निघून जाते. जेंव्हा घरी जाते तेंव्हा मीठाच्या पाण्याने आंघोळ करते. ही एकच गोष्ट अशी असते जी तुमच्यातील सगळ्या नकारात्मक उर्जा बाहेर काढते.

तू नेहमीच एक कणखर महीला राहीली आहेस… इतक्या वर्षांत तुझ्यात आणखी कोणत्या क्षमता वाढल्या आहेत?

अशा कितीतरी महीला आहेत, ज्यांना वाटते की त्या घर कोंबडी बनून रहात. त्या आपल्यापरीने खूपच चांगले काम करत आहेत. तरी त्यांना पण त्यांची मर्यादा आहे. परंतु जर तुम्ही हा आदर्श ठेवणार असाल, तर ते दुसऱ्यांसाठी अपायकारक आहे. कारण यातून तुमची मुले, त्यांच्या पत्नींना पायपुसण्याप्रमाणे वागवतील आणि तुमच्या मुलीही मोठ्या झाल्यावर पायपुसणीच बनून रहातील. सुखी या आमच्या चित्रपटातून आम्ही हेच दाखविले आहे. तुम्ही तुमचे ज्ञान तुमच्या मुलांना द्या. एक व्यक्ती म्हणून तुम्हाला खंबीर व्हायलाच हवे. देवाच्या आशिर्वादाने, अचानकपणे माझी श्रद्धा अतिशय ठाम झाली आहे. त्यामुळे कोणतीही परिस्थिती हाताळण्याची माझी ताकद गेल्या काही वर्षांत चौपट झाली आहे.

अप्रिय प्रसंगांना तू कशी सामोरी जातेस?

मी वर्तमानात जगते, येणाऱ्या प्रत्येक क्षणात मी जगते. आयुष्यात जे अनुभव येतात ते तुम्हाला शिकवण्यासाठी..तुम्ही त्याकडे एक धडा म्हणून पाहीले पाहीजे. तुमची श्रद्धा कधीच ढळू देवू नका. मी साईबाबांची भक्त आहे, त्यामुळे मी श्रद्धा आणि सबुरी या दोन्हीचे पालन करते. माझ्या मते, जेंव्हा तुम्ही कशाच्या तरी प्रतिक्षेत असता, त्यावेळी तुमच्याकडून घडणारी कृती.. तुम्ही एक व्यक्ती म्हणून कोण आहात, हे ठरवत असते. तुम्ही तुमच्या आयुष्यातील वाईट काळाला कसे सामोरे जाता, यावर हे सगळे अवलंबून असते. कठीण प्रसंगात तुमचा विश्वास कायम रहायलाच हवा. माझ्या आयुष्यात अगदी सर्वाधिक वाईट घडले, तरी मला वाटते ते एका मोठ्या कारणासाठीच घडले आहे.


हेही वाचा- ‘जवान’च्या सक्सेस पार्टीत शाहरुख-दीपिकाचा भन्नाट डान्स; व्हिडीओ व्हायरल

- Advertisment -