घरताज्या घडामोडीशिल्पा शेट्टीच्या नावाने कोट्यवधीची फसवणूक

शिल्पा शेट्टीच्या नावाने कोट्यवधीची फसवणूक

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या नावाने कोट्यवधींची फसवणूक केल्याचा प्रकार उत्तर प्रदेशमध्ये घडल्याचे उघडकीस आले आहे.

अभिनेता सलमान खान आणि अक्षय कुमारच्या नावाने फसवणूक केल्याची घटना जाती असताना अशी एक धक्कादायक घटना पुन्हा घडल्याचे उघडकीस आले आहे. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या नावाने कोट्यवधींची फसवणूक केल्याचा प्रकार उत्तर प्रदेशमध्ये घडल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी लखनऊ पोलिसांनी या घटनेचा छडा लावत फसवणूक करणाऱ्या हजरतगंजमधील एओसिस स्पा. And वेलनेस कंपनीच्या मालकासह त्याच्या कर्मचाऱ्यांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार; एओसिस स्पा And वेलनेस कंपनीचा एमडी किरणबाबा याने मिदासदीप एंटरप्राइजच्या संचालकाकडून फ्रेंचायजी शुल्काच्या नावाखाली काही पैशांची गुंतवणूक करवून घेतली होती. तसेच त्याच्याकडून गुंतवणूकदाराला, असे सांगण्यात आले होते की, त्याची ब्रँड अम्बॅसिडर प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी आहे.

- Advertisement -

विशेष म्हणजे किरणबाबाने शिल्पा शेट्टीच्या अनेक चांगच्या फोटोचा आणि बॅनर्सचा प्रचार देखील केला होता, अशी माहिती फसवणूक झालेल्यांनी दिली आहे. त्यासोबतच विविध ठिकाणी स्वत: शिल्पा शेट्टी देखील येते, असे देखील त्यांनी सांगितले. त्याच्या या बोलण्यावर विश्वास ठेवत किरणबाबा सोबत पार्टनरशीप करण्याचे ठरवले. मात्र, सतत त्यात त्यांचे नुकसान होऊ लागले. हे निदर्शनास आल्यानंतर पीडित व्यक्तींनी किरणबाबा विरोधात पोलीस ठाण्यात धाव घेतली.

दरम्यान, या चौकशीत आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी पीडित इसमाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी आणि त्याच्या कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – बापरे! देशात ५ दिवसांत सापडले लाखभर रुग्ण!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -