Monday, September 27, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन Shilpa Shetty : शिल्पाने मनोभावे केलं विघ्नहर्त्याचं स्वागत

Shilpa Shetty : शिल्पाने मनोभावे केलं विघ्नहर्त्याचं स्वागत

Related Story

- Advertisement -

लाडक्या बाप्पाचे आगमण आता लवकरच घरोघरी होणार आहे. सगळीकडे वरदविनायकाच्या आगमणाची चाहूल सर्वानांच लागून राहीली आहे. कोरोनाचे सावट(corona virus) असताना सुद्धा अगदी साध्या पद्धतीने गणरायाचे स्वागत करण्याची सूचना सरकारतर्फे देण्यात आली आहे. यंदाचा गणेशोत्सव देखील गाजावाजा न करता प्रत्येकाच्या घरी नेहमीप्रमाणे विराजमान होणार आहे. गणपती ही बुद्धीची देवता मानली जाते 14 विद्या 64 कलांचा अधिपती असणारा गणराय सर्वांचाच लाडका आपलासा वाटणारा आहे. प्रत्येकजण गणरायाच्या चरणी नतमस्तक होत भक्तीभावाने त्याचे स्वागत करतात. अवध्या दोन दिवसांवर असणाऱ्या बाप्पाच्या लगबगीमध्ये अनेक कलाकारांनी देखील बाप्पाचे स्वागत केलं आहे. बॉलिवूड कलाकारांच्या घरातील बाप्पाची लगबग काही औरच असते. दरम्यान अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या(shilpa shetty) घरी देखील गणपती बाप्पाचे(ganpati babba) स्वागत झाले आहे. शिल्पा स्वत: लालबागमध्ये बाप्पाची मुर्ती घरी घेऊन येण्यास गेली होती.(shilpa shetty take ganpati idol for home)

 

View this post on Instagram

 

A post shared by Bollywood Pap (@bollywoodpap)

- Advertisement -

कोरोना निर्बंधाचे पालन करत शिल्पा अणवानी पायाने गणरायाला घेण्यासाठी गेली होती. दरम्यान, पॅपराजीने शिल्पा भोवती घोळका घातला असून शिल्पाने विनंती करत गर्दी न करण्याचे आवाहन माध्यामांना केले. यावेळी शिल्पाच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता मात्र डोळे काहीसे पानावलेले दिसत होते. प्रत्येक क्षणी शिल्पा स्वत:ला सावरत असल्याचे दिसून येत आहे.

शिल्पासाठी ही वेळ फारच कठीण आहे. शिल्पाचा पती राज कुंद्राला प्रोर्नोग्राफी केसमध्ये मुंबई पोलिसांनी अटक केली असून गेल्या दीड महिन्यापासून राज पोलिसांच्या ताब्यात आहे. यामुळे यंदा शिल्पाला एकटीलाच गणरायाचे स्वागत करावे लागत आहे.


- Advertisement -

हे हि वाचा – रणवीरची हेअरस्टाईल पाहून नेटकऱ्यांना आले हसू, रणवीरचा एअरपोर्ट लूक व्हायरल !

- Advertisement -