Thursday, July 29, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन रामायणातील कथेवर आधारित डान्स परफॉर्मन्स पाहून शिल्पा शेट्टी झाली चकीत

रामायणातील कथेवर आधारित डान्स परफॉर्मन्स पाहून शिल्पा शेट्टी झाली चकीत

प्रतीती आणि श्वेता दोघेही स्पर्धक भारतीय शास्त्रीय नृत्याचा धमाकेदार डान्स परफॉर्मन्स सादर करणार आहे.

Related Story

- Advertisement -

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध डान्स रियालीटी शो ‘सुपर डान्सर 4’ याला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. यंदाच्या भागात प्रतीती आणि श्वेता दोघेही स्पर्धक भारतीय शास्त्रीय नृत्याचा धमाकेदार डान्स परफॉर्मन्स सादर करणार आहे. तसेच या दोघांना स्पर्धेतील माजी स्पर्धक साधवी मजुमदार याची साथ मिळणार आहे. हिंदू धर्मातील पौराणिक रामायणातील कथाची विण घालत. राम, लक्ष्मण आणि सीता वनवासाला निघताना, लक्ष्मण शूर्पनखाचे नाक कापताना, रावणाकडून सीतेचे अपहरण, रामाकडून रावणाचा वध आणि अयोध्येत राम, लक्ष्मण, सीता यांचे पुनरागमन अशी संपुर्ण कथेची झलक लहानश्या डान्स परफॉर्मन्स मधून दाखवण्यात आली आहे.शिल्पा शेट्‌टी कुंद्राने हा सुंदर डान्स बसवल्याबद्दल श्वेताचे अभिनंदन केले आणि म्हणाली, “ पूर्वी रामायण टीव्हीवर सुरु होते, तेव्हा माझी आजी खूप प्रेमाने ते पाहत होती. टीव्ही को एकदम सा साफ कर के, हाथ जोड करर बैठती थी.. आम्ही तेव्हा लहान होतो. काही घरांमध्ये तर टीव्हीला पुष्पहार घालत असत. त्यावेळी ते आम्हाला कळत नव्हते. आज मेरा ऐा मन किया की मै खडे हो कर, हाथ जोड कर इस अॅक्ट को देखूं..”
या अॅक्टने शिल्पा खूप भावूक झाली आणि तिने लोकांना आवाहन केले, “ हा अॅक्ट प्लीज.. प्लीज व्हायरल करा. नव्या पिढी साठी विशेषत: लहान मुलांसाठी हा अॅक्ट प्रत्येकाकडे शेअर झाला पाहिजे. मुलांनी हे पाहयला हवे, हे खरोखर सांगते. हे खूपच सुंदर आहे.”

- Advertisement -

रामायणातील ‘तीन देवियाँ’ हे प्रमुख कथानक पहाताना भारावून गेलेल्या गीता माँ ने शोच्या चार सिझनमधील ‘सर्वात दैवी अॅक्ट’ असे संबोधले. अनेक व्यक्तिरेखा आणि विविध भावना एकाच परफॉर्मन्समध्ये स्टेजवर सादर केल्याबद्दल तीन डान्सरचे कौतुक केले.

रॅपर बादशाहदेखील या सादरीकरणाने प्रभावित झाला आणि त्याला या विकेंडचा ‘बेस्ट अॅक्ट’ असे म्हटले. गीता माँ शी सहमत होत, त्यानेही या तिघांना शास्त्रीय नृत्याची जोपासना करत जगासमोर त्याचे सादरीकरण करण्याचे प्रोत्साहन दिले. “ ये अॅक्ट को आप प्लीज पूरे वर्ल्ड मे ले के जाओ! मैं पैसे नही खर्चता, पर मै इस अॅक्ट के लिए पैसा खर्चूंगा. मै देखने आऊंगा… मी जगभरात सादरीकरण केले आहे. मला वाटते की, तुम्ही हे आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचवावे”, अशी विनंती बादशाहने निर्माते आणि सादरकर्त्यांना केली.

- Advertisement -

अनुराग दादाने अभिमानाने म्हटले की, या परफॉर्मन्समुळे त्याला नशीबवान असल्यासारखे वाटते. ज्या देशाला अशा प्रकारचा समृद्ध सांस्कृतिक इतिहास आणि वारसा आहे. तसेच नृत्य, संगीत आणि नाटकांची परंपराही लोक मनापासून साजरी करतात. रामायण पुन्हा भव्य स्वरुपात सादर केल्याबद्दल त्यांनी स्पर्धकांचे अभिनंदन केले.

 हे हि वाचा – HBD: चार लाख रुपये घेऊन मुंबईत आली होती कतरीना कैफ, आज आहे कोट्याधीश 

- Advertisement -