बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी नेहमीच तिच्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते. सध्या शिल्पा तिच्या ‘इंडियन पुलिस फोर्स’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. दरम्यान, अशातच शिल्पाने सोशल मीडियावर तिचा एक फोटो शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय.
शिल्पाला मिळाला पुरस्कार
View this post on Instagram
सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये शिल्पाच्या गळ्यात मेडल घातलेलं दिसत आहे. हा फोटो शेअर करत शिल्पाने लिहिलंय की, “महाराष्ट्रात माननीय न्यायमूर्ती के.जी. बालकृष्णन आणि माननीय न्यायमूर्ती ज्ञान सुधा मिश्रा यांच्याकडून ‘चॅम्पियन्स ऑफ चेंज 2023’ पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल मी अत्यंत कृतज्ञ आहे. एक अभिमानी भारतीय म्हणून मी खूप आभारी आहे.” असं शिल्पाने लिहिलं आहे.
‘इंडियन पुलिस फोर्स’मध्ये शिल्पा मुख्य भूमिकेत
शिल्पा शेट्टीने रोहित शेट्टीच्या ‘इंडियन पोलिस फोर्स’ या वेबसीरीजमध्ये महिला पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. शिल्पा शेट्टीशिवाय सिद्धार्थ मल्होत्रा आणि विवेक ओबेरॉय देखील मुख्य भूमिकेत आहेत. याव्यतिरिक्त शिल्पा शेट्टी लवकरच संजय दत्तसोबत ‘केडी-द डेव्हिल’मध्ये दिसणार आहे.