Thursday, August 5, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी १४ वर्षांनंतर चित्रपटात शिल्पाचे कमबॅक, पण पतीच्या अटकेनंतर शिल्पा बॅकफुटला

१४ वर्षांनंतर चित्रपटात शिल्पाचे कमबॅक, पण पतीच्या अटकेनंतर शिल्पा बॅकफुटला

Related Story

- Advertisement -

अभिनेत्री शिल्पा शेट्टी १४ वर्षांनंतर ‘हंगामा २’ मधून पुन्हा चित्रपटसृष्टीत परतत आहे. २३ जुलैला हा चित्रपट हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे शिल्पाच्या चाहत्यांमध्ये एक वेगळीच उत्सुकता निर्माण झाली होती, कारण बऱ्याच काळानंतर शिल्पा चित्रपटात दिसणार होती. परंतु चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच शिल्पाच्या चाहत्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. कारण शिल्पाचा पती राज कुंद्राला पॉर्न फिल्मप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यामुळे फक्त शिल्पाचे चाहतेच नाही तर ‘हंगामा २’ चित्रपटाची पूर्ण टीममध्ये नाराजीचे वातावरण आहे. शिल्पा कॉमेडी चित्रपटातून कमबॅक करत होती, परंतु त्याचवेळेस तिच्या वैयक्तिक आयुष्यात ही घटना घडली. ज्यामुळे ती पुन्हा बॅकफुटवर जाण्याची शक्यता आहे.

२००७मध्ये शिल्पा शेट्टी ‘लाइफ इन मेट्रो’ आणि ‘अपने’ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर दिसली होती. त्यानंतर ती ‘ओम शांति ओम’ या शाहरुख खानच्या चित्रपटातील एक पार्टीच्या गाण्यात थिरकताना दिसली होती. नंतर ती ‘दोस्ताना’ मध्ये जॉन अब्राहम आणि अभिषेक बच्चनसोबत एका गाण्यात डान्स करताना दिसली. तसेच शिल्पाने निर्मातीच्या क्षेत्रात देखील पाऊल टाकले. तिने ‘ढिश्कियाऊं’ चित्रपटाच्या निर्मितीची धुरा सांभाळली. यामध्ये ती पाहुणी कलाकार होती.

- Advertisement -

आता ती १४ वर्षांनंतर प्रियदर्शनच्या ‘हंगामा-२’मध्ये दिसणार होती. शिल्पाच्या करिअरच्या सुरुवातील हिट झालेले गाणे ‘चुरा के दिल मेरा’ हे ‘हंगामा-२’मध्ये रिक्रिएट केले गेले आहे. या चित्रपटात तिने मिजान जाफरीसोबत या गाण्यावर डान्स केला आहे. शिल्पाने सांगितले की, ‘तिचा कमबॅक चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होत नाही आहे. यात तिची काही हरकत नाही. याबाबत तिला चिंता नाही आहे. ओटीटीवरील कंटेंट सर्वात महत्त्वाचा असतो आणि हा कॉमेडी चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होत असल्यामुळे जास्त लोकं पाहतील.’

पण आता पती राज कुंद्राच्या अटकेमुळे शिल्पा सुपर डान्सर रिअॅलिटी शोमधून गायब होणार आहे. येत्या काळात पती राजला जामीन मिळेल पण शिल्पासाठी टीव्ही शो, सोशल मीडिया, प्रमोशन हे सर्व पुन्हा मिळणे सोपे नाही आहे. तसेच याप्रकरणी शिल्पाला चौकशीसाठी बोलवण्यात येणार आहे की नाही? याबाबत अजूनही काही माहिती मिळाली नाही. राजच्या प्रत्येक व्यवसायात शिल्पा सहयोगी आहे. त्यामुळे शिल्पाला पण पोलिसांच्या चौकशीचा सामना करावा लागू शकतो. पण राज आणि शिल्पाला कोर्टाच्या फेऱ्या घालणे ही नवीन गोष्ट नाही आहे. परंतु सध्या फॉर्न फिल्मप्रकरण खूप गंभीर झाले आहे.

- Advertisement -