घरमनोरंजनअ‍ॅक्शन सीनदरम्यान शिल्पा शेट्टीच्या पायाला झाली गंभीर दुखापत

अ‍ॅक्शन सीनदरम्यान शिल्पा शेट्टीच्या पायाला झाली गंभीर दुखापत

Subscribe

शिल्पाला दुखापत झाल्याची माहिती तिने स्वताः तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर दिली आहेत. या फोटोमध्ये शिल्पा एका खुर्चीवर बसली असून तिच्या एका पायावर पट्टी बांधलेली दिसत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या पायाला शूटिंग दरम्यान गंभीर दुखापत झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री शिल्पा शेट्टी चित्रपट निर्माता रोहित शेट्टीच्या चित्रपटामधील एक अॅक्शन सीन शूट करत असताना तिच्या पायाला दुखापत झालेली आहे. दरम्यान, तिला आता हॉस्टिपटलमध्ये भर्ती करण्यात आलं आहे. डॉक्टरांनी शिल्पा शेट्टीच्या पायाला पट्टी बांधली आहे. तसेच शिल्पाला सहा आठवड्यांचा बेडरेस्ट घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

शिल्पा शेअर केला फोटो
शिल्पाला दुखापत झाल्याची माहिती तिने स्वताः तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर दिली आहेत. या फोटोमध्ये शिल्पा एका खुर्चीवर बसली असून तिच्या एका पायावर पट्टी बांधलेली दिसत आहे.

- Advertisement -

मात्र, एवढी दुखापत होऊनही शिल्पा हसताना दिसत आहे. हा फोटो शेअर करत शिल्पा शेट्टीने लिहिलंय की, “ते म्हणतात की, रोल, कॅमेरा, अॅक्शन आणि पाहा, पाय तुटला. सहा आठवड्यांसाठी मी अॅक्शन करू शकत नाही, परंतु मी आणखी चांगल्या प्रकारे परत येईन. तोपर्यंत आठवणीमध्ये ठेवा. शिल्पा शेट्टी कुंद्रा”

शिल्पाच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट्स देखील करत आहेत. डिझाइनर मनीष मल्होत्राने कमेंट करून लिहिलंय की, “शिल्पा तू लवकरात लवकर ठीक हो.” तर तिची लहान बहिण शमीता शेट्टीने लिहिलंय की, “माझी मुनकी खूप मजबूत आहे. ती लवकरच ठीक होईल.” तर शिल्पाचे अनेक चाहते देखील कमेंट करून तिला लवकर ठीक होण्याचा सल्ला देत आहेत.

- Advertisement -

‘इंडियन पुलिस फोर्स’च्या शूटिंग दरम्यान झाला अपघात
रोहित शेट्टीच्या ‘इंडियन पुलिस फोर्स’ या वेबसीरिजमध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टी, विवेक ओबेरॉय आणि सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत दिसून येणार आहेत. सिंघम, सिंबा आणि सूर्यवंशी या चित्रपटांसोबत या वेबसीरिजचा संबंध आहे. ही वेबसीरिज अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित करण्यात येईल.


हेही वाचा :आलियाचा ‘डार्लिंग्स’आता तमिळ, तेलुगू भाषांमध्ये देखील होणार प्रदर्शित

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -