Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन अंगूरी भाभी फेम शिल्पा शिंदे जगतेय सिंगल लाईफ

अंगूरी भाभी फेम शिल्पा शिंदे जगतेय सिंगल लाईफ

Subscribe

‘भाभीजी घर पर है’ मालिकेतून घराघरांत पोहचलेली शिल्पा शिंदे आज एक नावाजलेल्या अभिनेत्रींपैकी एक आहे. शिल्पाने ‘बिग बॉस’ आणि ‘चिडिया घर’ सारख्या काही मालिकांमध्ये सुद्धा काम केले आहे. शिल्पा शिंदे तिच्या उत्तम अभिनयासह डायलॉग डिलिवरीसाठी ओळखळी जाते. पण तिच्या खासगी आयुष्यातील एका किस्स्यामुळे ती फार चर्चेत आली होती.

खरंतर २००८ मध्ये शिल्पा शिंदे टीवी शो ‘मायका’ मध्ये दिसून आली होती. त्या दरम्यान ती आपला को-स्टार रोमित राज याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. ऐवढेच नव्हे तर त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. घरातल्यांनी सुद्धा लग्नासाठी होकार दिला होता. पण साखरपुडा झाल्याच्या एका महिन्याने म्हणजेच लग्नाच्या एक महिना आधी लग्न मोडले.

- Advertisement -

लग्नासाठी पत्रिका सुद्धा छापल्या गेल्या होत्या. पण त्यावेळी शिल्पानेच एक पाऊल पुढे जाण्याऐवजी ती मागे आली. खरंतर साखरपुडा मोडणे आणि लग्न न करण्याच्या तिच्या निर्णयामुळे परिवारातील सदस्य तिच्याशी सहमत नव्हते. सर्वांनी तिला समजावले होते तरीही ती आपल्या निर्णयावर ठाम राहिली.

- Advertisement -

भले शिल्पा रोमितवर खुप प्रेम करत होती. पण साखरपुड्यानंतर रोमित आणि त्याच्या परिवाराचे जे वागणे होते ते तिला आवडले नाही. तिला असे वाटत होते की, रोमितच्या परिवारासाठी जे काही करत होती त्यामुळे ते खुश नव्हते. खुप डिमांडिंग होते. ऐवढेच नव्हे तर लग्नानंतर माहेरच्या लोकांशी तिने संबंध मोडावेत असे ही त्यांना वाटत होते. हे शिल्पाला मान्य नव्हते. यामुळे तिने हे लग्न मोडण्याचा विचार केला. तिने यावेळी आपल्या परिवाराला प्राथमिकता दिली.

जेव्हा तो दोघे वेगळे झाले तेव्हा त्यांचे नाते फार चर्चेत आले होते. परंतु दोघांनी यावर गप्प राहणेच पसंद केले. पण नंतर एका मुलाखतीत तिने रोमित आणि तिच्या परिवाराबद्दल सांगितले होते. ऐवढेच नव्हे तर बिग बॉसच्या घरात ही तिने रिलेशनशिप बद्दलच्या काही गोष्टी उघड केल्या.

रोमित पासून विभक्त झाल्यानंतर शिल्पा शिंदे आजही सिंगल आहे आणि ते आयुष्य ती आनंदाने जगतेय. दुसऱ्या बाजूला रोमित हा सुद्धा आपल्या आयुष्यात सेटल झाला आहे. त्याने टीना कक्कड हिच्याशी लग्न केलेय.


हेही वाचा- Madhuri Dixit Birthday: माधुरीची डॉ. नेनेंसोबत ‘अशी’ सुरू झाली प्रेमकहाणी

- Advertisment -