Video: ‘मला कोणाचा बाप सुद्धा अडवू शकत नाही’

शिल्पा शिंदे हीने मिका सिंग सोबत झालेल्या पाकिस्तान संदर्भातील घटनेबाबत वक्तव्य केलं आहे. मिका सिंगवर बंदी घातली असताना शिल्पाने त्याला पाठिंबा दिला आहे.

काही दिवसांपूर्वी भारत-पाकिस्तानमध्ये तणाव सुरू असताना मिका सिंगने पाकिस्तानमधील कराचीमध्ये परफॉर्मन्स सादर केला होता. या परफॉर्मन्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर फारच व्हायरल झाला होता. यामुळे मिका सिंग पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. त्याच्यावर ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) ने बंदी घातली होती. मात्र आता मिका सिंगला अभिनेत्री शिल्पा शिंदे हीने पाठीशी घातलं आहे. नुकतंच तिने सोशल मीडियावरील व्हिडिओत म्हणाली आहे की, ‘मी पाकिस्तानमध्ये परफॉर्मन्स करणार, मला पाकिस्तानमध्ये जाण्यापासून कोणाचा बाप देखील रोखू शकत नाही,’ असं तिने म्हटलं आहे

तसेच ती म्हणाली आहे की, ‘जर माझा देश मला पासपोर्ट देत असेल आणि तिथला देश माझे स्वागत करत असेल तर मी नक्की पाकिस्तानला जाईन. मी एक कलाकार असल्याने मी नक्की परफॉर्मन्स करेन. कारण तो माझा हक्क आहे. मला कोणीही रोखू शकत नाही.’

नक्की वाचाVideo: पाकिस्तानी निवेदकाने दीपिका आणि प्रियांकावर केली टीका

पुढे ती अशी म्हणाली आहे की, ‘मी एक कलाकार आहे, कलाकाराला कोणी बंदी घालू शकतं नाही आणि मला कमवण्यासाठी कोणत्याही गोष्टीची गरज नाही आहे. मी रस्त्यावर स्टेज बांधून परफॉर्मन्स करून पैसे कमवू शकते. मी कोणालाही अजिबात घाबरत नाही, कोणाचा बाप मला पण रोखू शकणार नाही आणि तो कोणालाही रोखू शकत नाही. मिका सिंगला जबदरस्ती आणि छळकरून माफी मागायला सांगितली आहे,’ असं या व्हिडिओत शिल्पा म्हणाली आहे.

View this post on Instagram

#Bang#bangs

A post shared by shilpa shinde ? (@shilpa_shinde_official_) on

शिल्पा शिंदे ही ‘बिग बॉस’ सीझन ११ ची विजेता आहे. या शो अगोदर ती ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेत ती भाभीजीची भूमिका साकारली होती. पण काही दिवसांनंतप तिने निर्मात्यांवर मानध न दिल्याचं आरोप करून मालिका सोडली होती.