घरताज्या घडामोडीकोरोनाचे कारण देत चॅनलवाले कलाकारांच शोषण करतात, शिल्पा शिंदेने केला आरोप

कोरोनाचे कारण देत चॅनलवाले कलाकारांच शोषण करतात, शिल्पा शिंदेने केला आरोप

Subscribe

प्रत्येक विषयावर परखडपणे मत मांडणारी शिल्पा शिंदे हीने आता कलाकारांचे मानधन कपात केल्याबद्दल प्रॉडक्शन हाऊसवर निशाणा साधला आहे. शिल्पा म्हणाली की, चॅनलचे लोक येथे काम करणाऱ्या कलाकारांचे शोषण करीत आहेत. ती पुढे म्हणाली की, गेल्या काही महिन्यांपासून काम बंद आहे.  त्यामुळे कोणचेही उत्पन्न आलेले नाही.  असे चॅनलचे विधान पूर्णपणे चुकीचे आहे. लॉकडाउनच्या दिवसात चॅनलने त्यांचे जुने कार्यक्रम चालविले होते, जे त्यांचे हिट होते. त्यामुळे चॅनलकडे पुरेसा पैसा आला आहे. माझा ‘भाभी जी घर पर है’ हा जुना शो चॅनेलने चालविला. अशा जुन्या कार्यक्रमांमुळे चॅनलला बऱ्यापैकी पैसे मिळाले.

- Advertisement -

सर्व वाहिन्यांनी येथे काम करणाऱ्या लोकांची संख्या कमी केली आहे. ज्यामुळे त्यांच्या बर्‍याच पैशांची बचत होत आहे. पण जेव्हा कलाकारांना पैसे देण्याची वेळ येते तेव्हा सर्व चॅनेलवाले कारणं देतात.

शिल्पा ‘गँग्स ऑफ फिल्मिस्तान’ चे चित्रीकरण करत आहे. करत आहे आणि यात सुनील ग्रोव्हर मुख्य भूमिकेत आहे. याविषयी ती म्हणाले की, ‘गँग्स ऑफ फिल्मिस्तान’ हा कार्यक्रम करताना मी खूप खूश आहे. केवळ ३ महिने हा कार्यक्रम सुरू राहणार आहे. इतर टीव्ही कार्यक्रमांप्रमाणेच वर्षानुवर्षे हा कार्यक्रम होणार नाहीये. मी माझ्या पेमेंटवर खुश आहे आणि स्टारशी माझे संबंध खूप आधिपासूनचे आहेत. मला माझ्या एका ओळखीच्यांनी सांगितले की, कलाकारांचे पैसे कमी करण्यात आले आहेत. हे ऐकून मला फार वाईट वाटलं. लॉकडाऊनमुळे कलाकारांकडे काम नव्हते. आता जर पैसे कापले तर त्यांच घर कसं चालणार?

- Advertisement -

लॉकडाऊनमधील आर्थिक अडचणीविषयी बोलताना शिल्पा म्हणाली की वर्षानुवर्षे काम केल्यावर मी स्वत: साठी महागड्या गाड्या नाही तर एक दुकान विकत घेतलं, त्यामुळे दरमहा मला भाडे मिळायचे. पण लॉकडाऊनमध्ये दुकान बंद असल्यामुळे भाडे आले नाही. अशा परिस्थितीत मी बचत केलेले पैसे कामी आले.

लवकरच शिल्पा एका कॉमेडी शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोमध्ये शिल्पा एका वेगळ्या अंदाजात दिसणार आहे.


हे ही वाचा – बायकोचे भावाशी अनैतिक संबंध, पतीला समजताच काढला सख्ख्या भावाचा काटा!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -