शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदींनी केली आलिया आणि रणबीरची पाठराखण

आलिया आणि रणबीरची बाजू घेत शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. प्रियंका चतुर्वेदी यांनी त्यांच्या ट्वीटर अकाऊंट एक जुना फोटो शेअर केला आहे ज्या फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी काही बॉलिवूड कलाकारांसोबत दिसत आहेत.

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भटट्च्या आगामी ब्रम्हास्त्र चित्रपटावर सध्या सोशल मीडियावर बहिष्काराची मागणी केली जात आहे. अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर सध्या त्यांच्या आगामी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी चित्रपटाची संपूर्ण टीम हैदराबाद मध्ये दाखल झाली होती, दरम्यान मंगळवारी चित्रपटाच्या टीमने मध्य प्रदेशच्या उज्जैन मधील महाकाल मंदिरामध्ये बाबा महाकालचे दर्शन घेतले. मात्र या वेळी त्यांना मंदिरामध्ये प्रवेश करताना काही लोकांकडून विरोधाचा सामना पत्कारावा लागला. बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी रणबीरच्या वक्तव्यावरून त्यांना मंदिरामध्ये प्रवेश करण्यास विरोध केला.

दरम्यान, याप्रकरणात आलिया आणि रणबीरची बाजू घेत शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. प्रियंका चतुर्वेदी यांनी त्यांच्या ट्वीटर अकाऊंट एक जुना फोटो शेअर केला आहे ज्या फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी काही बॉलिवूड कलाकारांसोबत दिसत आहेत. हा फोटो शेअर करत प्रियंका चतुर्वेदी यांनी लिहिलं की, “या फोटो तुमची कोणतीही मदत करणार नाही. तो शांतच राहील. उज्जैन महाकालेश्वर मंदिर एक उदाहरण आहे. लाज वाटते की राजकारणामध्ये अशा पद्धतीची विकृती जन्माला येत आहे. प्रत्येक चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्याला विरोध करणे सध्या एक व्यवसाय झाला आहे.”

रणबीर आणि आलियाला मंदिरामध्ये प्रवेश बंदी
रणबीर, आलिया आणि अयान मुखर्जी जेव्हा मंदिराच्या गेटपाशी पोहोचले तेव्हा विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांनी मोठमोठ्याने घोषणा द्यायला सुरू वात केली. तसेच चित्रपटाच्या टीमला काळ्या रंगाचे झेंडे दाखवले. पोलिसांनी जेव्हा कार्यकर्त्यांना रोकण्याचा प्रयत्न केला मात्र, विरोधी ऐकत नसल्याने त्यांच्यवर लाठीचार्ज करयाला सुरूवात केली. मात्र, या चित्रपटाचा दिग्दर्शक अयान मुखर्जीला मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेता आलं. परंतु रणबीर, आलियाला मंदिरात प्रवेश करण्यास बंदी करण्यात आली.


हेही वाचा :

श्रेयस तळपदे, मुक्ता बर्वे खेळणार ‘आपडी-थापडी’चा खेळ