घरमनोरंजनShiv Thakare Viral Video :टक्कल, मोठे मोठे फोड, शिव ठाकरेची अवस्था पाहून...

Shiv Thakare Viral Video :टक्कल, मोठे मोठे फोड, शिव ठाकरेची अवस्था पाहून चाहते हैराण

Subscribe

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नसतो. कधीकधी अनेकांचं आयुष्य सोशल मीडिया बदलून टाकते. पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये मराठमोळ्या अभिनेत्याचा विचित्र लूक दिसत आहे. या लूकमध्ये त्या अभिनेत्याला ओळखणे देखील कठीण झाले आहे.

बिग बॉसच्या गेल्या सीझनमध्ये विजेता म्हणून ज्याच्या नावाची सर्वाधिक चर्चा होती त्या शिव ठाकरेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. तो व्हिडिओ पाहिल्यावर त्याच्या चाहत्यांना मोठा धक्काच बसला आहे. शिवचा तो अवतार पाहून त्याला काय झाले असेल असा प्रश्न व्हिडिओ पाहणाऱ्यांना पडल्याचे त्यांच्या कमेंटवरुन दिसत आहे.

- Advertisement -

अभिनेता शिव ठाकरेने स्वत: सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्याने ‘मस्ती अंगाशी आली’ असं कॅप्शन देत व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शिवच्या चेहऱ्यावर प्रोस्थॅटिक मेकअप दिसत आहे. त्यानंतर त्याचा चेहरा पूर्ण बदललेला दिसत आहे. हा बदललेला लूक घेऊन शिव रस्त्यावर चालताना दिसत आहे. तो रिक्षावाल्याकडे जाऊन भीक मागताना दिसत आहे. तसेच तो एका शोरुम बाहेर जाऊन असतो तेवढ्यात तेथील सिक्युरिटी गार्ड त्याला हकलून देतो. एक महिला शिवला पाहून भयानक घाबरते आणि जोरजोरात ओरडू लागते. व्हिडीओच्या शेवटी एक रिक्षावाला त्याला पैसे देतो आणि सर्वांचे मन जिंकतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shiv Thakare (@shivthakare9)

 बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात विजेतेपद मिळवणाऱ्या शिवची लोकप्रियता मोठी आहे. त्याला सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्या चाहत्यांची संख्याही मोठी आहे. यापूर्वीच्या त्याच्या व्हायरल व्हिडिओ आणि फोटोंना चाहत्यांनी कमेंट दिल्या आहेत.

- Advertisement -

हिंदी आणि मराठी मनोरंजन विश्वात आपल्या नावाची वेगळी ओळख शिवनं तयार केली आहे. बिग बॉस हिंदीच्या सीझनमध्ये त्यानं विजेतेपद मिळवावं अशी त्याच्या लाखो चाहत्यांची इच्छा होती. पण त्याच्याऐवजी एमसी स्टॅनचे नाव जाहीर झाले आणि चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

शिव ठाकरे सध्या ‘झलक दिखला जा’ या शोमध्ये डान्सचा जलवा दाखवताना दिसत आहे. या शोमध्ये अरशद वारसी, फराह खान आणि मलायका अरोरा परिक्षक म्हणून दिसत आहेत. २०१७मध्ये शिव ‘एमटीवी रोडीज रायजिंग’मध्ये स्पर्धक म्हणून दिसला होता. त्यानंतर २०१९मध्ये तो बिग बॉस मराठी सिझन २ दिसला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -