Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबने म्हटलं,“मला तो प्रचंड आवडतो.."

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबने म्हटलं,“मला तो प्रचंड आवडतो..”

Subscribe

घरा- घरा मध्ये पाहिला जाणारा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम म्हणून ओळखला जातो. या कार्यक्रमाने अनेक कलाकारांना नवी ओळख दिली. या कार्यक्रमातील सर्वच कलाकारांना प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत असतं. त्यांच्या कामाबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी देखील त्यांचे चाहते नेहमी उत्सुक असतात. यापैकीच एक कलाकार म्हणजे शिवाली परब. आता शिवालीने तिचा क्रश कोण आहे हे सांगितलं आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मुळे शिवालीचा मोठा चाहतावर्ग तयार झाला. शिवाली देखील सोशल मीडियावर सक्रिय राहून तिच्या आयुष्यात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी, तिचे ग्लॅमरस फोटो, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाच्या पडद्यामागील गमतीजमती चाहत्यांशी शेअर करत असते. तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी तिचे चाहते कायम उत्सुक असतात.

- Advertisement -

Shivali Parab Biography, Age, Family & Movies - MixIndia

शिवालीनं नुकतीच एका प्रतिष्ठीत माध्यम समुहाला दिलेल्या मुलाखतीत तिच्या क्रशचं नाव सांगितलं आहे. आता शिवालीनं तिच्या क्रशचं नाव सांगताच अनेकांना आश्चर्य झाले. तर शिवालीच्या काही चाहत्यांना तिचं क्रश कोण आहे हे जाणून घ्यायची इच्छा आहे.

- Advertisement -

Maharashtrachi Hasya Jatra Hasyacha Triple Dose Season 1 Episode 64 Mad  Melodrama, Prasad-Nimish-Shivali - Airtel Xstream (Airtel TV)

शिवालीला तिच्या क्रश विषयी विचारण्यात येताच तिनं सांगितलं की ‘मला शाहरुख खान खूप आवडतो. खूप म्हणजे प्रचंड आवडतो. कोणी विचार करू शकणार नाही इतकं माझं शाहरुखवर क्रश आहे. मी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पाहते की तो सरप्राइज द्यायला कुठेकुठे भेटायला जातो आणि त्यांच्या फॅन्सना भेटून सरप्राइज देतो वगैरे. असं काही माझ्यासोबत व्हायला हवं अशी माझी इच्छा आहे. एकंदरीत माझं शाहरुखवर खूप मोठं क्रश आहे. अशातच मी जबरदस्त मोठी त्याची फॅन आहे.


हेही वाचा :

Photo : सोनाली कुलकर्णीचा मराठमोळा लूक चर्चेत

- Advertisment -