शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णी अडकले विवाहबंधनात

मराठी मालिकासृष्टीतील अभिनेता विराजस कुलकर्णी आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे यांचा ३ मे रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर विवाहसोहळा पार पडला. गेल्या अनेक दिवसांपासून यांच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर चालू होती. एक-दोन दिवसांपूर्वी त्यांच्या मेहंदीचे फोटो समोर आले होते, दरम्यान आता विराजसने त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या लग्नाचे काही फोटो शेअर करत विराजसने खाली कॅप्शनमध्ये “फायनली!” असं लिहिलं आहे. तसेच दोघांनी लग्नात साउथ इंडियन पद्धतीचा  पारंपारिक पोशाख परिधान केला आहे.

सध्या त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड वायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये विराजस आणि शिवानीच्या चेहरा आनंदाने खुललेला दिसत आहे.

 

खरंतर शिवानी आणि विराजस अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते, ‘डावीकडून चौथी बिल्डिंग’ या विराजसच्या नाटकामध्ये शिवानीने अभिनय केला होता. तेव्हाच दोघांची पहिली भेट झाली होती. त्यानंतर नाटकाच्या सेटवर दोघांची मैत्री झाली आणि पुढे त्याचेच रुपांतर हळूहळू प्रेमात झालं.

विराजसने ‘माझा होशील ना’ या मालिकेतून मालिकासृष्टीत पदार्पण केलं होतं, तर शिवानीने अनेक लोकप्रिय मराठी मालिकांमध्ये काम केले आहे.

 


हेही वाचा :‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील अंजली बाई अन् राणा दा झाले खऱ्या आयुष्यातील पती-पत्नी