Maharashtra Assembly Election 2024
घरमनोरंजनShivani Sonar : शिवानी अन् अंबरची बॅचलर्स पार्टीत धमाल, लवकरच अडकणार लग्नबंधनात

Shivani Sonar : शिवानी अन् अंबरची बॅचलर्स पार्टीत धमाल, लवकरच अडकणार लग्नबंधनात

Subscribe

अभिनेता अंबर गणपुळे ‘राजा राणीची गं जोडी’, ‘सिंधुताई माझी माई’ फेम शिवानी सोनारशी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. 9 एप्रिलला दोघांचा मोठ्या थाटामाटात साखरपुडा पार पडला होता. साखरपुड्यानंतर सहा महिन्यांनी अंबर आणि शिवानी बोहल्यावर चढण्यासाठी सज्ज झाले आहेत. नुकतीच दोघांची बॅचलर पार्टी झाली. याचे फोटो शिवानीने नुकतेच सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

I wish some nights lasted forever, असं कॅप्शन लिहित शिवानी सोनारने बॅचलर पार्टीचे फोटो शेअर केले आहेत. लग्नाआधी मित्र-मैत्रिणीबरोबर अंबर आणि शिवानीने बॅचलर पार्टी केली. या फोटोंमध्ये शिवानी-अंबर त्यांच्या मित्र-मैत्रिणींसोबत धमाल करताना दिसत आहेत. यावेळी अंबरने निळ्या रंगाच्या शेडमधील शर्ट आणि जीन्स परिधान केली होती. तर शिवानीने पांढऱ्या रंगाचा आउटफिट घातला होता. तर दोघांच्या मित्र-मैत्रिणींनी काळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. अंबर आणि शिवानीच्या या बॅचलर पार्टीचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

- Advertisement -

काही महिन्यांपूर्वी शिवानी आणि अंबरने गुपचूप साखरपुडा उरकला. ते दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचं त्यांनी त्यावेळीच उघड केलं. त्याच्या सरप्राईज एंगेजमेंटने सगळ्यांनाच धक्का बसला. ते बराच काळ रिलेशनशिपमध्ये होते पण त्यांनी त्यांच्या साखरपुड्याच्या बातमीनेच त्यांनी त्यांचं रिलेशनशिप उघड करायचं ठरवलं होतं.

शिवानीने या आधी कलर्स मराठीवरील राजा रानीची गं जोडी या मालिकेत काम केलं होतं. ही मालिका खूप गाजली होती. या मालिकेमुळे शिवानीला प्रसिद्धी मिळाली. तर अंबरने रंग माझा वेगळा या मालिकेत काम केलं होतं. त्यानंतर त्यांची कलर्स मराठीवर दुर्गा ही मालिका सुरु होती. नुकतीच ही मालिका संपली.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -