घरमनोरंजनलग्नानंतर शिवानी, अजिंक्य हनिमूनला, शेअर केली खास पोस्ट

लग्नानंतर शिवानी, अजिंक्य हनिमूनला, शेअर केली खास पोस्ट

Subscribe

मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री शिवानी सुर्वे. आपल्या अभिनयाच्या जोरावर शिवानीने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. नुकतेच शिवानीने अभिनेता अजिंक्य ननावरेबरोबर लग्नगाठ बांधली. मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने हा लग्सोहळा पार पडला. दोघांच्या लग्नाचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून शिवानी व अजिंक्यच्या लग्नची चर्चा सुरु होती. अखेर दोघांनी १ फेब्रुवारीला लग्नगाठ बांधत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. लग्नाच्या एक दिवस अगोदर म्हणजे ३१ जानेवारीला दोघांचा साखरपुडा पार पडला. आता लग्नानंतर अजिंक्य व शिवानी एकमेकांबरोबर वेळ घालवताना दिसत आहेत. दोघे एका सुंदर ठिकाणी हनिमूनला गेले आहेत.

अंजिक्यने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओवरुन तो आणि शिवानी निसर्गरम्य जागी फिरायला गेल्याचे दिसून येत आहे. अजिंक्यनं त्यांच्या हनिमूनचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो पाहून चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. त्यानं एक खास व्हिडिओ शेअर केलाय, यात शिवानी आणि त्याचा खास बॉन्ड पाहायला मिळतोय. व्हिडिओसोबत त्यानं लिहिलंय की, तिची नव्यानं ओळख करून द्यायचीये…माझ्या बायकोला भेटा…असं त्यानं लिहिलंय. या व्हिडिओवर नेटकरी आणि चाहत्यांना लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

- Advertisement -

 शिवानीचा लुक चर्चेत
या व्हिडिओत शिवानीच्या लुकने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलंय. हनिमूनला गेलेल्या शिवानीच्या हातात हिरव्या रंगाचा चुडा पाहायला मिळतोय. अनेकजणी लग्नानंतर हा बांगड्यांचा चुडा काढून ठेवतात, पण शिवानीनं मात्र हिरव्या बांगड्या काढल्या नाहीयेत. वेस्टर्न कपड्यांवर हिरवा चुडा उठून दिसतोय.

शिवानी व अंजिक्यच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, शिवानी देवयानी मालिकेतून घराघरांत पोहचली. ‘बिग बॉस मराठी’ या कार्यक्रमातही तिने सहभाग घेतला होता. मालिकांबरोबर तिने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्येही काम केले आहे. काही महिन्यांपूर्वीच तिचा ‘झिम्मा २’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपपटाने चांगली कमाईक केली होती. तर अंजिक्य सध्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत महत्वाची भूमिका साकारताना दिसत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -