घरमनोरंजन‘शिवप्रताप–गरुडझेप’ चित्रपटाचा 'या' शहरांमध्ये होणार दिमाखदार प्रीमियर

‘शिवप्रताप–गरुडझेप’ चित्रपटाचा ‘या’ शहरांमध्ये होणार दिमाखदार प्रीमियर

Subscribe

‘आग्र्याहून सुटका’ हा शिवचरित्रातील हा महत्त्वाचा अध्याय ‘शिवप्रताप–गरुडझेप’ या चित्रपटातून प्रेकक्षकांना पाहायला मिळणार आहे.

डॉ. अमोल कोल्हे यांचा ‘शिवप्रताप–गरुडझेप’ हा बहुचर्चित चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. विजयादशमीच्या मुहुर्तावर 5 ऑक्टोबर रोजी ‘शिवप्रताप–गरुडझेप’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. इतिहासाच्या पानांमध्ये अभिमानाने कोरलेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक आग्रा सुटकेचा थरार दाखवणाऱ्या या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे प्रदर्शनाआधी या चित्रपटाचे 5 शहरांत विशेष शोसुद्धा आयोजित करण्यात आले आहेत. या चित्रपटाच्या भव्यतेप्रमाणेच प्रिमियरची भव्य तयारीसुद्धा करण्यात आली आहे. मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, बेळगाव या पाच महत्त्वाच्या शहरात हे प्रिमियर होणार आहेत.

हे ही वाचा – ‘बिग बॉस 16’ मध्ये सुद्धा होणार तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्राची एन्ट्री

- Advertisement -

शनिवार 1 ऑक्टोबर रोजी नाशिकच्या सिटी सेंटरमध्ये संध्याकाळी 7 वाजता, रविवार 2 ऑक्टोबर सिटीप्राइड कोथरुड, पुणे संध्याकाळी 7 वाजता, सोमवार 3 ऑक्टोबर कोल्हापूर आयनॉक्स संध्याकाळी 7 वाजता, मंगळवार 4 ऑक्टोबर बेळगाव आयनॉक्स संध्याकाळी 7 वाजता तर दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर 5 ऑक्टोबर रोजी मुंबईतील अंधेरी इन्फिनिटी मध्ये रात्री 8 वाजता हे दिमाखदार प्रिमियर रंगणार आहे. चित्रपटातील कलाकारांच्या टीमसोबत विविध क्षेत्रातील मान्यवर सुद्धा या स्पेशल शोसाठी उपस्थित राहणार आहेत.

- Advertisement -

‘आग्र्याहून सुटका’ हा शिवचरित्रातील हा महत्त्वाचा अध्याय ‘शिवप्रताप–गरुडझेप’ या चित्रपटातून प्रेकक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात डॉ. अमोल कोल्हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार असून त्यांच्यासोबत यतीन कार्येकर, प्रतीक्षा लोणकर, हरक अमोल भारतीय, शैलेश दातार, हरीश दुधाडे, मनवा नाईक, पल्लवी वैद्य, अजय तपकिरे, रमेश रोकडे, अलका बडोला कौशल, आदी ईराणी, विश्वजीत फडते या कलाकारांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन कार्तिक राजाराम केंढे यांनी केले आहे. तर डॉ.अमोल कोल्हे, विलास सावंत, सोनाली घनश्याम राव, चंद्रशेखर ढवळीकर, कार्तिक राजाराम केंढे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

हे ही वाचा – राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘गोष्ट एका पैठणीची’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -