घरमनोरंजनश्लोका अन् आकाश अंबानींनी मुलीचं ठेवलं 'हे' सुंदर नाव; नेटकऱ्यांनी केलं कौतुक

श्लोका अन् आकाश अंबानींनी मुलीचं ठेवलं ‘हे’ सुंदर नाव; नेटकऱ्यांनी केलं कौतुक

Subscribe

नुकत्याच काही दिवसांपूर्वी अंबानी कुटुंबात राजकन्येचा जन्म झाला. नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी आणि त्यांची पत्नी श्लोका अंबानी दुसऱ्यांदा आई-वडील झाले. 31 मे रोजी श्लोकाने एका गोंडस मुलीला जन्म दिला असून मुलीच्या जन्माने अंबानी कुटुंबिय सध्या खूप आनंदात आहेत. अशातच, आता त्यांच्या मुलीच्या नावाचा खुलासा करण्यात आला आहे.

आकाश-श्लोकाच्या मुलीचं नाव काय?

आकाश अंबानी आणि त्याची पत्नी श्लोकाने त्यांच्या मुलीचं नाव ‘वेदा’ ठेवले आहे. अंबानी कुटुंबीयांकडून एक स्टेटमेंट जारी करण्यात आलं आहे. ज्यात त्यांनी या नावाचा खुलासा केला. त्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी लिहिलंय की, “श्री कृष्णाच्या कृपेने आणि धीरुभाई आणि कोकिलाबेन अंबानींच्या आशीर्वादाने पृथ्वी आपल्या लहान बहिण वेदा आकाश अंबानीच्या जन्माची घोषणा करुन आनंदीत झाला आहे .”

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

- Advertisement -

या निवेदनात आकाश, श्लोका, नीता आणि मुकेश अंबानी , श्लोकाचे आई-वडील, ईशा, आनंद, राधिका , अनंत आणि कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावांचाही उल्लेख करण्यात आला आहे . सोशल मीडियावर लोकांना श्लोका आणि आकाशच्या मुलीचे नाव खूप आवडले आहे. एकाने कमेंटमध्ये लिहिलंय की, वाह किती सुंदर नाव आहे. वडील आकाश, मुलगा पृथ्वी, आई श्लोका आणि मुलगी वेद. वेदांचे ज्ञान असलेली मुलगी खूप छान आहे.

2020 मध्ये दिला होता मुलाला जन्म

आकाश अंबानी आणि त्यांची पत्नी श्लोका अंबानी यांचे 9 मार्च 2019 रोजी लग्न थाटात पार पडले होते. 10 डिसेंबर 2020 मध्ये श्लोकाने तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला होता. या मुलाचे नाव त्यांनी पृथ्वी ठेवले होते.

- Advertisement -

हेही वाचा :

रणबीर कपूरने खरेदी केली ‘आदिपुरूष’ चित्रपटाची 10 हजार तिकिटं

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -