घरमनोरंजनसानिया मिर्झाचं नाव ऐकून शोएबची तिसरी पत्नी भडकली; व्हिडीओ व्हायरल

सानिया मिर्झाचं नाव ऐकून शोएबची तिसरी पत्नी भडकली; व्हिडीओ व्हायरल

Subscribe

मागील काही दिवसांपूर्वी माजी पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकने भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झासोबत घटस्फोट घेऊन तिसऱ्यांदा लग्न केले. शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदची नवीन जीवनसाथी म्हणून निवड केली. लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताच अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. दरम्यान, तेव्हापासून सानिया मिर्झा, शोएब मलिक आणि सना जावेद सतत चर्चेत आहेत. नुकताच सना जावेदचा स्टेडियममधील एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यात सानियाच्या चाहत्यांनी असं काही केलं जे पाहून सना सर्वांकडे रागाने पाहू लागली.

सना जावेदचा व्हिडीओ व्हायरल

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

सानिया मिर्झा आणि शोएब मलिकच्या जोडीचे अनेक चाहते होते. परंतु त्यांच्या घटस्फोटानंतर चाहते नाराज झाले आहेत. शोएबच्या तिसऱ्या लग्नाने त्याचे आणि सानियाचे अनेक चाहते नाराज आहेत. त्यामुळे शोएबच्या तिसऱ्या लग्नाचे अनेक मिम्स देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. दरम्यान, शोएबची तिसरी पत्नी सना जावेद नुकतीच स्टेडियम पोहोचली होती. यावेळी तिला पाहून अनेकजण “सानिया मिर्झा… सानिया मिर्झा….” असं मोठमोठ्याने ओरडू लागले. सानियाचं नाव ऐकताच सनाने ओरडणाऱ्या व्यक्तींकडे रागाने पाहिलं आणि ती पुढे निघून गेली. सध्या सनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

- Advertisement -

या व्हिडीओवर अनेकजण कमेंट्स देखील करताना दिसत आहेत. यावर एका युझरने लिहिलंय की, ‘जे कोणाचे घर तोडतात ते कधीही सुखी होऊ शकत नाहीत.’ तर दुसऱ्या युझरने लिहिलंय की, ‘हिला मिरची लागली.’ तर आणखी एका यूझरने लिहिलंय की, ‘पूर्व असो वा पश्चिम… सानिया सर्वोत्तम आहे.

2010 मध्ये सानिया-शोएबचं झालं होतं लग्न

भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचे लग्न 12 एप्रिल 2010 झाली हैदराबादमध्ये झाले होते. त्यांना इजहान नावाचा एक मुलगा आहे. त्याचा जन्म 2018 मध्ये झाला होता. सानिया आणि माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांच्या केमिस्ट्रीने एके काळी प्रत्येकाला आश्चर्यचकित करुन टाकले होते. सानियाआधी शोएबने आयशा सिद्दीकीसोबत पहिले लग्न केले होते. सानिया शोएबची दुसरी पत्नी होती.


हेही वाचा : Don 3 : ‘डॉन 3’ मध्ये ‘या’ अभिनेत्रीची धमाकेदार एन्ट्री

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -