Tuesday, February 16, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी अक्षया आणि सुयशच्या नात्यात दुरावा? 'सुयश'च्या भावूक पोस्टमुळे चर्चेला उधाण

अक्षया आणि सुयशच्या नात्यात दुरावा? ‘सुयश’च्या भावूक पोस्टमुळे चर्चेला उधाण

Related Story

- Advertisement -

मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांच्या रिलेशनशिप्स, ब्रेकअप, लग्न, घटस्फोट अशी कारणे नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. काहीजण छोट्या पडद्यावर काम करतानाच एकमेकांचे आयुष्यभराचे साथीदार बनतात, तर काही गलफ्रेंड- बॉयफ्रेंड बनतात. यांपैकी काही जोडीदार आपल्या पार्टनरला शेवटपर्यंत साथ देतात, तर काहींचा संसार अर्धातच मोडला जातो. अशा कलाकारांचे ब्रेकअप किंवा घटस्फोट त्यांच्या चाहत्यांसाठी एक मोठा धक्काच असतो. सध्याही सिनेसृष्टीतील एका खास कपलच्या ब्रेकअपची जोरदार चर्चा प्रेक्षकांमध्ये सुरू आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील अभिनेत्री अक्षया देवधर आणि ‘का रे दुरावा’ मालिकेतून घराघरांत पोहोचलेला अभिनेता सुयश टिळक यांचा ब्रेकअप झाल्याचे म्हटले जात आहे.

सुयश आणि अक्षया ही जोडी मराठी सिनेसृष्टीतील खास कपल म्हणून ओळखले जात होती. त्या दोघांनीही सोशल मीडियाद्वारे एकमेकांसोबतचे फोटो टाकून आपल्या प्रेमाची कबूली दिली होती. पण सध्या त्यांच्या नात्यात दुरावा आलेला असून दोघांमध्ये नक्कीच काहीतरी बिनसले असल्याचे चित्र दिसत आहे. सुयशने त्याच्या अकाऊंटवरील त्याचे अक्षयासोबतचे अनेक एकत्र असलेले फोटो डिलिट केले आहेत. इन्स्टाग्रामवर सुयशने नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टमध्ये  प्रेमाच्या खास नात्याबद्दल आणि प्रेम करणाऱ्या व्यक्तींबद्दल काही गोष्टी लिहिल्या आहेत. एखाद्यावर प्रेम केलं तर ते प्रेम निस्वार्थी असावं, आपल्या जोडीदाराच्या कठीण प्रसंगात आपण त्याच्या पाठीशी उभं राहायला हवं. अशा पद्धतीची भावूक पोस्ट सुयशने शेअर केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suyash Tilak (@suyashtlk)

- Advertisement -

२०१८ मध्ये सुयशने दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यात अक्षयाच्या हातात एक मोठी हिऱ्याची अंगठी दिसल्याने दोघांनी गूपचूप साखरपूडा उरकला असल्याची चर्चा चाहत्यांमध्ये सुरू झाली होती. मात्र या केवळ अफवा असल्याचे नंतर समोर आले.


- Advertisement -

हे ही वाचा- शेवंता आणि अण्णा पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

- Advertisement -