घरमनोरंजनरियाच्या वडिलांबाबत धक्कादायक माहिती; शौविक आणि ड्रग डिलरच्या संवादातून खुलासा

रियाच्या वडिलांबाबत धक्कादायक माहिती; शौविक आणि ड्रग डिलरच्या संवादातून खुलासा

Subscribe

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात रिया चक्रवर्ती आणि भाऊ शौविक चक्रव्रती यांच्यानंतर आता तिच्या आई- वडिलांचीही चौकशी केली जाणार आहे. सीबीआयसोबतच नारकोटिक्स ब्युरो या प्रकरणात ड्रग्जच्या अनुषंगाने चौकशी करत आहेत. सीबीआय, ईडी आणि नारकोटिक्स या तिघांच्या चौकशीतून एक-एक धक्कादायक माहिती समोर येत असून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, रियाचा भाऊ शौविक याचे ड्रग डिलरसोबतचे थेट कनेक्शन उघड झाले आहे. शौविक आणि ड्रग डिलर यांच्यातील मेसेजवरील संवाद उघड झाले आहेत.

रियाने सुशांतला ड्रग्सचा ओव्हर डोस दिल्याचा आरोप सुशांतच्या कुटुंबियांनी केला आहे. याचा तपास नारकोटिक्स ब्युरो करत आहेत. या प्रकरणी अनेकांची त्यांनी चौकशी केली. दरम्यान, त्यांनी एका ड्रग डिलरला अटक केली असून त्याने शौविकसोबत थेट संपर्कात असल्याचे कबूल केले आहे. रियाचा भाऊ शौविक आणि ड्रग डिलर यांच्या हा संवाद व्हायरल होत असून यामध्ये रियाच्या वडिलांचा देखील उल्लेख आला आहे. रियाचे वडिल इंद्रजीत चक्रवर्ती हे देखील ड्रग घेत होते का? असा प्रश्न यातून उपस्थित होत आहे. व्हायरल चॅटमध्ये शौविक डिलरकडे ड्रगची मागणी करत आहे.

- Advertisement -

शौविकचे ड्रग डिलरसोबतचे व्हायरल चॅट –

शौविक: भावा कुठं आहे?
ड्रग डिलर: घरीच आहे.
शौविक: बूम (मारूआना) पाहिजे भावा, बाबांना हवं आहे. त्यांचा माल संपल्याचं त्यांना समजलंच नाही.
ड्रग डिलर: माझ्याकडंचाही माल संपलाय, उद्या देतो.

सुशांत प्रकरणात अमली पदार्थांच्या देवाण- घेवाणीत चार मोठी नावे गुंतलेली आहेत. यात मुंबईतील दोन नेते, एक टीव्ही अभिनेता आणि एक सिनेनिर्माता यांचा हात असल्याचे म्हटले जाते. एनसीबीचे महासंचालक राकेश अस्थाना या प्रकरणाचा तपास करत आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

मुंबईत मलेरियाचे थैमान; ऑगस्टमध्ये सापडले १ हजार १३७ रुग्ण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -