घरताज्या घडामोडीMushtaq Merchant: शोले फेम अभिनेते, कॉमेडियन मुश्ताक मर्चेंट यांचे निधन

Mushtaq Merchant: शोले फेम अभिनेते, कॉमेडियन मुश्ताक मर्चेंट यांचे निधन

Subscribe

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते आणि कॉमेडियन मुश्ताक मर्चेंट यांचे वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील होली फॅमिली रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या दिवसांपासून ते डायबिटीज सारख्या गंभीर आजाराचा सामना करत होते. मुश्ताक यांनी अनेकवर्षांपासून सिनेसृष्टीत महत्त्वाचे योगदान दिले होते. त्यांच्या निधनाच्या बातमीने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. अनेक बॉलिवूड कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

हाथ की सफाई, सीता और गीता, जवानी दिवानी, सागर प्यार का साया आणि फिफ्टी फिफ्टी, शोले सारख्या अनेक सिनेमांमध्ये त्यांनी काम केले आहे. शोले सिनेमातील त्यांची भूमिका विशेष गाजली होती. शोलेमध्ये त्यांनी एक नाहीतर दोन व्यक्तीरेखा साकारल्या होत्या. मुश्ताक मर्चंट यांनी विनोदी भूमिकांसोबतच चरित्र भूमिका देखील साकारल्या होत्या.

- Advertisement -

मीडिया रिपोर्टनुसार, मुश्ताक यांना मुंबई ऑल इंडिया इंटर कॉलेज स्पर्धांमध्ये उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. त्याचप्रमाणे अनेक नामांकित पुरस्कारांवर त्यांनी आपले नाव कोरले आहे. सलग तीन वर्ष त्यांना उत्कृष्ट लेखक आणि दिग्दर्शनासाठी पुरस्कार मिळाला होता. बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधी त्यांना मिळाली होती. अभिनयासोबतच त्यांना लिखाणाची आवड होती. साथ ही साथ प्यार का साया, लाड साहब, अपने साजन के और गॅग सारख्या सिनेमांचे स्क्रिनप्ले त्यांनी लिहिले होते. मात्र मुश्ताक मर्चंट यांनी १६वर्षांपूर्वी बॉलिवूडला रामराम ठोकला होता. त्यानंतर ते डायबिटिज आजाराचा सामना करत होते.

 

- Advertisement -

हेही वाचा – दिशा पटानीचा बिकनीत जलवा, बोल्ड लूकने चाहते घायाळ

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -