अनुष्का शर्माने केली ‘Chakda Xpress’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात

या चित्रपटामध्ये झूलन गोस्वामीच्या संघर्षात्मक आणि प्रेरणादायक प्रवासाची गोष्ट दाखण्यात आली आहे. जेव्हा अनुष्का शर्माने या चित्रपटाची अनाउंसमेंट केली होती तेव्हा, तिने त्यात लिहिले होते की, हा चित्रपट माझ्यासाठी खूप खास आहे, कारण यामध्ये त्यागाची गोष्ट दाखण्यात येणार आहे.

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा गेल्या काही दिवसांपासून तिच्या ‘Chakda Xpress’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. शिवाय इतकंच नव्हे तर अनुष्का शर्माने ‘Chakda Xpress’ चित्रपटाचे शूटिंगही सुरू केले आहे. या चित्रपटामध्ये अनुष्का, भारताची वेगवान गोलंदाज झूलन देवीची भूमिका साकारत आहे. अनुष्का तिच्या या चित्रपटाच्या माध्यमातून बऱ्याच काळानंतर चित्रपटसृष्टीत पुन्हा परतली आहे. अनुष्का याआधी 2018 मध्ये ‘जीरो’ या चित्रपटात दिसली होती.

क्रिकेट प्रेमींसाठी आवडीचा चित्रपट
आपल्या मुलीला जन्म दिल्यानंतर अनुष्काचा हा पहिला चित्रपट असणार आहे. तसेच अनुष्काचे चाहते सुद्धा तिच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. कारण, हा चित्रपट एका क्रिकेटर वर आधारित असणार आहे. त्यामुळे क्रिकेट प्रेमींसाठी ही आनंदाची बातमी आहे. सूत्रांच्या मते, अनुष्का या चित्रपटाच्या शूटिंगसाठी 30 दिवसांपर्यंत यूकेमध्ये राहिल.

‘Chakda Xpress’ मध्ये दिसणार एक प्रेरणादायक गोष्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

या चित्रपटामध्ये झूलन गोस्वामीच्या संघर्षात्मक आणि प्रेरणादायक प्रवासाची गोष्ट दाखण्यात आली आहे. जेव्हा अनुष्का शर्माने या चित्रपटाची अनाउंसमेंट केली होती तेव्हा, तिने त्यात लिहिले होते की, “हा चित्रपट माझ्यासाठी खूप खास आहे, कारण यामध्ये त्यागाची गोष्ट दाखण्यात येणार आहे”. ‘Chakda Xpress’ चित्रपट भारतातीय क्रिकेट टीमची आधीची कॅप्टन झूलन गोस्वामी वर आधारित आहे. ज्यावेळी झूलन गोस्वामी ने क्रिकेटर होऊन भारताला जगभरात वेगळी ओळख द्यायचे ठरवले. त्यावेळी स्त्रीयांनी असा विचार करणं देखील खूप मोठ्ठी गोष्ट मानली जाते. या चित्रपटामध्ये झूलन देवीच्या प्रवासा बद्दल आणि महिला क्रिकेट बद्दल सांगण्यात येणार आहे. तसेच हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

या गोष्टीला घाबरते अनुष्का शर्मा
अनुष्का शर्मा बऱ्याच दिवसांनंतर चित्रपटसृष्टीत कमबॅक करत आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या सुरूवातीला शूटिंग वेळी ती स्वताःला कॉन्फिडंट समजत नव्हती. तेव्हा तिने शूटिंग सुरू केले तेव्हा ती खूप घाबरली होती. कारण मुलीला जन्म दिल्यानंतर ती स्वताःला खूप कमजोर असल्यासारखे वाटत होते.

 


हेही वाचा :कमल हासनच्या ‘Vikram’ चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच कमावले 200 करोड