गंगूबाई काठियावाडी सिनेमाचे चित्रीकरण पूर्ण,आलियाने लिहिली भावूक पोस्ट

आलियाच्या आतापर्यंत सिनेमातील हा सर्वात वेगळा आणि दमदार सिनेमा

Shooting of Gangubai Kathiawadi movie completed, emotional post share by Alia bhatt
गंगूबाई काठियावाडी सिनेमाचे चित्रीकरण पूर्ण,आलियाने लिहिली भावूक पोस्ट

बहुप्रतिक्षित गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi movie ) सिनेमाचे शुटींग नुकतेच पूर्ण झाले आहे. मुंबई फिल्म सिटी, गोरेगाव येथे सिनेमाचे शुटींग सुरु होते. सिनेमाचे शुटींग संपताच अभिनेत्री आलिया भट ( Alia bhatt) हिने चाहत्यांसाठी एक फोटो शेअर करत भावनिक पोस्ट लिहिली आहे. आलियाने संजय लिला भन्साली यांच्यासोबतचा फोटो शेअर करत असे म्हटले आहे की, ८ डिसेंबर २०१९ रोजी आम्ही सिनेमाचे शुटींग सुरु केले होते. दोन वर्षांनी सिनेमाचे शुटींग पूर्ण झाले आहे. सिनेमा आणि सिनेमाचा सेट दोन वेळा लॉकडाऊन आणि वादळात गेला. शुटींग दरम्यान सिनेमाचे निर्माते आणि दिग्दर्शन यांना देखील कोरोनाची लागण झाली. सेटने अनेक त्रासांचा सामना केला तो एक वेगळा सिनेमा आहे, असे आलियाने म्हटले आहे. (Shooting of Gangubai Kathiawadi movie completed, emotional post share by Alia bhatt)

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt ☀️ (@aliaabhatt)

आलियाच्या आतापर्यंत सिनेमातील हा सर्वात वेगळा आणि दमदार सिनेमा ठरणार आहे. गंगुबाई काठियावाडी हा सिनेमा माझे आयुष्य बदलवणारा अनुभव आहे. संजय भन्साली सरांसोबत काम करणे हे माझे स्वप्न होते. आज मी हा सेट एक वेगळी व्यक्ती म्हणून सोडत आहे. खूप प्रेम सर…धन्यवाद…तुमच्यासारखे कोणी नाही, असे आलियाने पोस्ट मध्ये म्हटले आहे.

शेवटी आलियाने पोस्टमध्ये लिहिले आहे, जेव्हा एखादा सिनेमा संपतो तेव्हा त्यातील एक भाग संपतो. मी आज माझा एक भाग गमावला आहे,गंगू आय लव्ह यू! तुझी आठवण येईल… अशा भावना आलियाने व्यक्त केल्या आहेत.


हेही वाचा – RD Burman birthday: ‘पंचम’दा भारतीय चित्रपट संगिताला अजरामर करणारा अवलिया