घरताज्या घडामोडीराज कपूर पार्टीत जाताना घरातली व्हिस्की न्यायचे

राज कपूर पार्टीत जाताना घरातली व्हिस्की न्यायचे

Subscribe

राज कपूर आपल्यात नाहीत . पण तरीही त्यांच्या प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्यातील अनोखे किस्से चाहत्यांमध्ये चर्चिले जातात.

बॉलीवूडचे शो मॅन राज कपूर यांचे देशातच नाही तर परदेशातही लाखो चाहते आहेत. आज राज कपूर आपल्यात नाहीत . पण तरीही त्यांच्या प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्यातील अनोखे किस्से चाहत्यांमध्ये चर्चिले जातात. याचं कारण आहे त्यांची प्रचंड लोकप्रियता. त्यांच व्यक्तिमत्व आणि त्यांचे अजब शौक. पण त्यांची काही खास वैशिष्ट्यही आहेत. त्यांच्या अशाच एका वेगळ्या छंदाबदद्ल आम्ही तुम्हांला सांगणार आहोत.

राज कपूर अन् त्यातही कपूर खानदान म्हणजे खवय्याचं खानदान. खाण्यापिण्याचे शौकीन असलेल्या कुटुंबातच जन्माला आल्यामुळे राज कपूर यांनाही वेगवेगेळे पदार्थ खाण्याबरोबरच वेगवेगळे मद्याचे ब्रँड चाखण्याचा छंदच होता. पण त्यांच विशेष प्रेम होतं ते ‘जॉनी वॉकर ब्रँड’च्या ‘ ब्लॅक व्हिस्की’वर. ती ही थेट लंडनच्या दुकानातून आणलेली. त्यांना त्याच दुकानातली जॉनी वॉकर आवडायची. राज यांचे पुत्र रणधीर कपूर यांनी एका मुलाखतीत हे सांगितलं होतं. की माझ्या वडिलांना मद्य पिणे आवडायचे. पण ते कुठलंही मद्य पित नव्हते. तर त्यांचा स्वता:चा असा ब्रँड होता. जॉनी वॉकर ब्रँडची ब्लॅक व्हिस्की त्यांना प्रिय होती.

- Advertisement -

लंडनमधून ते ती खास मागवायचे. एवढचं नाही तर बॉलीवूडच्या कुठल्याही पार्टीत जातानाही ते तिच व्हिस्की सोबत न्यायचे. तसेच ही व्हिस्की ते फक्त त्यांच्या जवळच्या व्यक्तींबरोबर शेअरही करायचे. त्या खास व्यक्तींमध्ये अभिनेत्री तनुजाही होत्या. दुबईहून आणलेली ब्लॅक लेबल व्हिस्की ते आपल्या मित्रांसाठी ठेवायचे. तर दिल्ली व मुंबईतील ब्लॅक व्हिस्की ते आपल्या मुलांना व नातेवाईंकाना द्यायचे. यामुळे आम्हांला राग यायचा असेही रणधीर कपूरने सांगितले आहे.

 

- Advertisement -

 

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -