धर्मवीर आनंद दिघेंच्या दहीहंडीत श्रद्धा कपूरची हजेरी; मराठमोळ्या अंदाजात म्हणाली..

आज धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या टेंभी नाक्यावरील दहीहंडीला बॉलिवड अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने देखील भेट दिली. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील तिथे उपस्थित होते.

आज राज्यभरात सर्वत्र दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. मागील दोन वर्षांच्या ब्रेकनंतर यंदा नागरिकांमध्ये दहीहंडी जल्लोषात साजरी केली जात आहे. दरम्यान, याचं निमित्ताने मुंबईमधील अनेक ठिकाणी सार्वजनिक दहीहंडीचा कार्यक्रम साजरे केले जात आहेत. याचं निमित्ताने सार्वजनिक दहीहंडी उत्सवांमध्ये मराठी कलाकारांपासून ते  बॉलिवूडमधील अनेक नामवंत कलाकार भेट देतात. दरम्यान, आज धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या टेंभी नाक्यावरील दहीहंडीला बॉलिवड अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने देखील भेट दिली. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील तिथे उपस्थित होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shraddha ✶ (@shraddhakapoor)

धर्मवीर आनंद दिघे यांच्या टेंभी नाक्यावरील मानाची हंडीची दरवर्षी चर्चा होते. यंदा देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. त्यावेळी मुख्यमंत्री यांनी भाषण केलं, त्यानंतर श्रद्धा कपूरने देखील मराठमोळ्या अंदाजात भाषण केलं. त्यावेळी तिने ठाणेकरांना मराठीमध्ये दहीहंडीच्या शुभेच्छा दिल्या.
श्रद्धाचा मराठमोळा अंदाज
कार्यक्रमात श्रद्धाने माईक हातामध्ये घेऊन मराठी बोलायला सुरूवात केली, त्यावेळी ती म्हणाली की, “कसं काय ठाणेकर…नमस्कार. सर्वांना दहीहंडीच्या शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्यासोबत आहेत, यापेक्षा जास्त आपल्याला काय हवं? दिघे साहेबांची दहीहंडी खूप मोठी असते, हे मी नेहमी ऐकल होतं, पण आज ते प्रत्यक्षात पाहता आलं. तुम्ही मला जे प्रेम देता त्यासाठी तुमचे खूप खूप आभार,” असं श्रद्धा त्यावेळी मराठीमध्ये म्हणाली.

हेही वाचा :‘गॉसीप आणि बरंच काही’ मालिकेत पाहायला मिळणार कलाकारांची धमाल मस्ती!