घरमनोरंजनश्रद्धा कपूरच्या "ठुमक्यां"वर चाहते घायाळ; श्रद्धा -रणबीरचे नवे गाणे झाले प्रसिद्ध

श्रद्धा कपूरच्या “ठुमक्यां”वर चाहते घायाळ; श्रद्धा -रणबीरचे नवे गाणे झाले प्रसिद्ध

Subscribe

अभिनेत्री श्रध्दा कपूर ही एक उत्तम नृत्यांगणा आहे हे सर्वांनाच माहित आहे. नुकतेच श्रद्धाचे एक नवे गाणे प्रसिध्द झाले आहे. या गाण्यामधील तिच्या नृत्यावर चाहते आणि प्रेक्षक घायाळ झालेले पाहायला मिळत आहे. या गाण्यामध्ये तिच्यासोबत अभिनेता रणबीर कपूर दिसून येत आहे.

अभिनेत्री श्रध्दा कपूर ही एक उत्तम नृत्यांगणा आहे हे सर्वांनाच माहित आहे. नुकतेच श्रद्धाचे एक नवे गाणे प्रसिध्द झाले आहे. या गाण्यामधील तिच्या नृत्यावर चाहते आणि प्रेक्षक घायाळ झालेले पाहायला मिळत आहे. या गाण्यामध्ये तिच्यासोबत अभिनेता रणबीर कपूर दिसून येत आहे.

बहुप्रतीक्षित असा ‘तू झूठी मैं टक्कार’ या चित्रपटाचा ट्रेलर महिन्याभरापूर्वी प्रसिद्ध करण्यात आला आहे. या चित्रपटात अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अभिनेता रणबीर कपूर मुख्य भूमिकेत दिसून येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रसिद्ध झाल्यानंतर हा चित्रपटाच्या प्रदर्शनाकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. दिग्दर्शक लव्ह रंजन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

- Advertisement -

‘तू झूठी मैं मक्कार’ या चित्रपटाचे आतापर्यंत दोन गाणी प्रसिद्ध झाली आहेत. यातील तिसरे गाणे मंगळवारी (ता. २१ फेब्रुवारी) प्रसिद्ध करण्यात आले. या गाण्याने सध्या इंटरनेटवर एकच धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटातील “शो मी द ठुमका” हे गाणे प्रसिद्ध करण्यात आले आहे. यामध्ये श्रद्धा कपूरच्या ठुमक्यांवर चाहते घायाळ झाले आहेत. या गाण्यात श्रद्धाने पिवळ्या रंगाची साडी घातली आहे. यामध्ये ती सुंदर अशा बोल्ड लूकमध्ये दिसत आहे. पण तिच्या या गाण्यातील ठुमक्यांमुळे सध्या इंटरनेटवर हे गाणे सर्वाधिक व्हायरल होत आहे. या गाण्यात रणबीर कपूरने देखील उत्कृष्ट डान्स केला आहे. या गाण्यातील रणबीर आणि आलियाच्या केमिस्ट्रीला देखील प्रेक्षकांनी पसंती दिली आहे.

हेही वाचा – अजय-काजोलची लेक न्यासा पुन्हा झाली ट्रोल; व्हिडीओ होतोय व्हायरल

- Advertisement -

याआधी या चित्रपटातील ‘तेरे प्यार में’ आणि ‘प्यार होता कै बार है ही गाणी प्रसिद्ध झाली होती. पण त्यापेक्षा या गाण्यात श्रद्धा कपूरने केलेला डान्स आणि पिवळ्या साडीतील तिचे ठुमके नेटकऱ्यांना वेड लावतं आहे. सुनिधी चौहान आणि शाश्वत सिंग यांनी हे गाणे गायलेले असून अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिलेले आहे. तर गणेश आचार्य यांनी याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shraddha ✶ (@shraddhakapoor)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -