Friday, April 9, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन 'चालबाज इन लंडन' मध्ये श्रद्धाचा डबल रोल

‘चालबाज इन लंडन’ मध्ये श्रद्धाचा डबल रोल

तिच्या या नव्या कोऱ्या चित्रपटासाठी फार उत्सुक असल्याचे तिने सांगितले आहे.

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर लवकरच तिचा आगमी चित्रपट ‘चालबाज इन लंडन’ मध्ये दिसणार आहे. नुकतच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करत श्रद्धाने तिच्या या नव्या कोऱ्या चित्रपटाची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात श्रद्धा डबर रोल साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे. १९८९ मध्ये प्रदर्शित झालेला अभिनेत्री श्रीदेवी कपूर यांचा ‘चालबाज’ या चित्रपटातील गाण्यावर हा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘चालबाज इन लंडन’ या चित्रपटासाठी मी फार उत्सुक आहे” ,असे म्हणत श्रद्धाने हा टिझर तिच्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shraddha ✶ (@shraddhakapoor)

 श्रीदेवीच्या ‘चालबाज’ या चित्रपटाची निर्मीत करणारे पंकज पराशर यांनीच ‘चालबाज इन लंडन’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. भूषण कुमार, कृष्ण कुमार, अहमद खान आणि शायरा खान यांनी या चित्रपटाची निर्मित केली आहे. ‘बागी ३’ नंतर श्रद्धा कपूर आणि अहमद खान पुन्हा एकत्र काम करताना दिसणार आहे. एका मुलाखतीदरम्यान श्रद्धाने, मी स्वत:ला खूपच नशीबवान समजते. चालबाज इन लंडन साठी त्यांनी माझी निवड केल्याने माझा आनंद द्विगुणित झाला आहे. विशेष म्हणजे मला यात डबर रोल करण्याची पहिल्यांदाच संधी मिळत आहे. एक अभिनेत्री म्हणून मला ही जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडायची आहे. भूषण सर आणि अहमद सर यांच्यामुळे हे काम करताना कोणत्याच अडचणी येणार नाहीत. त्यामुळे आता श्रद्धाला डबर रोल मध्ये पाहाण्यासाठी चालबाज इन लंडन चित्रपटाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.


- Advertisement -

हे वाचा- अक्षय कुमार, गोविंदा पाठोपाठ भूमी पेडणेकर आणि विकी कौशल कोरोना पॉझिटिव्ह

- Advertisement -