घरमनोरंजन'तारक मेहता' च्या 'या' अभिनेत्याचं निधन, वयाच्या ४७ व्या वर्षी घेतला अखेरचा...

‘तारक मेहता’ च्या ‘या’ अभिनेत्याचं निधन, वयाच्या ४७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Subscribe

जगेश मुकाटी यांनी अनेक हिंदी आणि गुजराती मालिकांमध्ये काम केलं

‘अमिता का अमित’, ‘श्रीगणेश’ यांसारख्या मालिका व ‘हंसी तो फसी’, ‘मन’ या चित्रपटांत भूमिका साकारणारे अभिनेते जगेश मुकाटी यांचे निधन झाले. १० जून रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ४७ वर्षांचे होते. त्यांना दीर्घ काळापासून अस्थमाचा आजार होता. ते गेल्या चार दिवसांपासून रुग्णालयात दाखल होते. बुधवारी त्यांना श्वास घेताना खूप त्रास जाणवला. अखेर दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.

जगेश मुकाटी यांनी अनेक हिंदी आणि गुजराती मालिकांमध्ये काम केलं. ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेतही काम करून त्यांनी प्रेक्षकांची मन जिंकली. मात्र बुधवारी दुपारी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याने त्यांच्या अकाली निधनानं कला क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

- Advertisement -

यापुर्वी ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मध्ये डॉक्टर हत्तीची भूमिका साकारणारा अभिनेता’ कवि कुमार आझाद ‘यांच्या निधनाने देखील चाहत्यांसह मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला होता.

- Advertisement -

दरम्यान गुजराती रंगभूमीवर अभिनेते जगेश मुकाटी स्वतःची वेगळी ओखळ निर्माण केली होती आणि अनेक टीव्ही मालिका आणि हिंदी-गुजराती चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते. त्यांनी ‘अमिता का अमित’, ‘कसम से’ या मालिकांमध्ये काम केले होते. मात्र त्यांना धीरज कुमार यांची निर्मिती असलेल्या ‘श्रीगणेश’ या मालिकेतील गणेशाच्या मुख्य भूमिकेतून लोकप्रियता मिळाली होती. अनेक जाहिरातींमध्येही ते दिसले. अलीकडेच ते ‘चाल जीवी लईए’ या गुजराती चित्रपटात झळकले होते. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील अभिनेत्री अंबिका रांजणकर यांनी जगेश यांच्यासोबत कसम से या मालिकेत आणि दोन गुजराती नाटकांत काम केले होते. सोशल मीडियावर त्यांनी पोस्ट लिहित जगेश यांना श्रद्धांजली वाहिली. ‘खूपच दयाळू, साथ देणारे आणि कमालीची विनोदबुद्धी असणारे व्यक्तीमत्त्व.. खूप लवकर आम्हाला सोडून गेले.. तुमची खूप आठवण येईल’, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.


वडिलांच्या आठवणीत ही मराठी अभिनेत्री झाली भावूक; म्हणाली… काही हात निसटले!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -