श्रेया बुगडे हे मराठी सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव आहे. ती एक अष्टपैलू अभिनेत्री आहे. जिने अभिनय आणि विनोदाचं परफेक्ट टायमिंग साधून प्रेक्षकांच्या मनात हक्काची जागा मिळवली आहे. ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय शोमधून तिला ‘कॉमेडी क्वीन’ अशी ओळख मिळाली. श्रेया बुगडे ही उत्तम अभिनेत्री आहे, यात शंकाच नाही. पण त्यासोबत ती एक उद्योजिकादेखील आहे. चला तर जाणून घेऊया श्रेया बुगडेविषयी काही खास गोष्टी.. (Shreya Bugde journey from actress to businesswoman)
जन्म आणि शिक्षण
श्रेया बुगडेचा जन्म 2 फेब्रुवारी 1988 रोजी पुण्यात झाला. पण शिक्षण मुंबईतून झाले. तिने सेंट झेवियर्स हायस्कूलमधून शालेय शिक्षण तर मिठीबाई कॉलेज जुहू येथून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. याशिवाय तिने वेलिंगरकर इन्स्टिट्यूटमधून जाहिरात आणि पी आर कोर्सदेखील केला आहे.
View this post on Instagram
अभिनयाची आवड असल्यामुळे श्रेयाने लहानपणीच अभिनय विश्वातील कारकिर्दीची सुरुवात केली. बालकलाकार म्हणून ‘वाटेवरती काचा ग’ या मराठी नाटकात तिने काम केले होते. ज्याचे सुमारे 275 प्रयोग सादर केले गेले. मराठीसोबत हिंदी, इंग्रजी आणि गुजराती नाटकांमध्येही तिने काम केलं आहे.
अशी बनली ‘कॉमेडी क्वीन’
अभिनेत्री श्रेया बुगडेने 2002 मध्ये ‘तू तिथे मी’द्वारे मराठी मालिका विश्वात पदार्पण केले. इथून तिने टेलिव्हिजनवर विविध मालिकांमध्ये काम करताना ‘फु बाई फु’ या शोमध्ये सहभाग घेतला. ज्यातून तिला विनोदाचं अचूक टायमिंग मिळालं आणि पुढे तिने ‘चला हवा येऊ द्या’मधून प्रेक्षकांचं मन जिंकलं. बघता बघता तिच्या विनोदी अभिनयाचा दर्जा असा काही उंचावला की, प्रेक्षक तिला ‘कॉमेडी क्वीन’ म्हणू लागले. अभिनय विश्वात अफाट प्रसिद्धी मिळवल्यानंतर तिने उद्योग क्षेत्रात पदार्पण केले.
हॉटेल इंडस्ट्रीत पदार्पण
अभिनेत्री म्हणून श्रेया बुगडेने यश संपादन केल्यानंतर आता हॉटेल क्षेत्रात नशीब आजमावते आहे. जानेवारी 2024 मध्ये तिने मुंबईत दादरमधील शिवाजी पार्क येथे ‘द बिग फिश अँड कंपनी’ नावाचे रेस्टॉरंट सुरू केले. हे रेस्टॉरंट सीफूड स्पेशल असल्यामुळे नॉनव्हेज लव्हर्ससाठी मोक्याचं ठिकाण ठरलंय.
हेही पहा –
Ranveer Allahbadia : रणवीर अलाहाबादीयाच्या वादानंतर कंटेंट क्रिएटर्सच्या कमाईत मोठी घट