बॉलिवूड संगीत विश्वातील प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल तिच्या सुमधुर आवाजामुळे प्रत्येकाच्या मनावर राज्य करते. आजवर तिने विविध भाषांमध्ये हजारो गाणी गायली आहेत. त्यामुळे श्रेयाचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. जो तिला ऐकण्यासाठी कायम उत्सुक असतो. श्रेया तिच्या कारकिर्दीशिवाय वैयक्तिक आयुष्यामुळेदेखील अनेकदा चर्चेत येते. तसेच सोशल मीडियावर सक्रिय असल्यामुळे ती कायम वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत सर्वांचे लक्ष वेधून घेते. नुकतीच श्रेयाची एक पोस्ट व्हायरल झाली आहे. ही पोस्ट तिने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शेअर केली होती. (Shreya Ghoshal shared Unseen photos of her wedding day)
श्रेया घोषालच्या सुखी संसाराची दशकपूर्ती
गायिका श्रेया घोषालने 5 फेब्रुवारी 2015 रोजी शिलादित्य मुखोपाध्यायसोबत लग्न केले. नुकतीच तिच्या सुखी संसाराला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त गायिकेने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. अत्यंत रोमँटिक अंदाजात तिने ही पोस्ट पती शिलादित्यसाठी लिहिली आहे. यामध्ये श्रेयाने त्यांच्या लग्नातील काही सुंदर क्षणांचे फोटो शेअर केले आहेत. सोबत कॅप्शनमध्ये लग्नाला 10 वर्ष पूर्ण झाली असं सांगत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
View this post on Instagram
या पोस्टच्या कॅप्शनमध्ये श्रेया घोषालने लिहिलंय, ‘आपल्या लग्नाच्या 10 व्या वाढदिवसानिमित्त खूप शुभेच्छा! मला आजही तो दिवस आठवतो आणि हे सगळं कालंच घडलंय, असं वाटतं. मुळात आपण एकमेकांसाठी आहोत हीच आनंदाची गोष्ट आहे. या पूर्ण प्रवासात, आम्ही आणखी एकमेकांमध्ये अडकत गेलो. शिवाय आमचा मुलगा देवयान हा देवाने आम्हाला दिलेला एक मोठा आशीर्वाद आहे. या प्रत्येक गोष्टीसाठी मी कृतज्ञ आहे! तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा आणि प्रेमाबद्दल मनापासून आभार…!’
हॅशटॅग श्रेयादित्य
गायिकेने ही पोस्ट शेअर करताना कॅप्शनशेवटी श्रेयादित्य, श्रेयादित्यान असे हॅशटॅग दिले आहेत. सोशल मीडियावर श्रेया आणि शिलादित्य यांच्या लग्नातील हे अनसीन फोटो बरेच व्हायरल होत आहेत. श्रेया घोषालच्या अहोंबद्दल सांगायचं झालं तर, शिलादित्य मुखोपाध्याय हा कॉलर आयडी आणि स्पॅम ब्लॉकिंग ॲप Truecaller साठी एका मोठ्या पदावर काम करतो. तसेच एप्रिल 2022 पासून Truecaller फॉर बिझनेसचा ग्लोबल हेड म्हणून तो या कंपनीत कार्यरत आहे.
हेही पहा –
Chhaava : घृष्णेश्वराच्या आशीर्वादाने छावाच्या प्रमोशनची दणक्यात सुरुवात