Saturday, March 15, 2025
27 C
Mumbai
HomeमनोरंजनShreyas Talpade : श्रेयस तळपदेचं छोट्या पडद्यावर कमबॅक, रिॲलिटी शो होस्ट करणार

Shreyas Talpade : श्रेयस तळपदेचं छोट्या पडद्यावर कमबॅक, रिॲलिटी शो होस्ट करणार

Subscribe

गेल्या अनेक दिवसांपासून ‘चल भावा सिटीत’ या आगामी रिऍलिटी शोची चर्चा आहे. या बहुचर्चित शोचे सूत्रसंचालन कोण करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर याचं उत्तर आता समोर आलंय. एका प्रोमोमध्ये एक व्यक्ती पाठमोरी चालताना दिसतेय. त्यासोबत कॅप्शन लिहिलेलं होतं की, ‘तो येतोय शो गाजवायला! कोण बरं असेल तो? कंमेंट्समध्ये सांगा!’ यावर अनेक युजर्सनी ‘श्रेयस तळपदे’ अशी कमेंट केली होती. तर प्रेक्षकांचा अंदाज अगदी तंतोतंत खरा ठरलाय. या शोचा होस्ट म्हणून श्रेयस तळपदे पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकणार आहे. (Shreyas Talpade will host new reality show chal bhava cityt)

 

View this post on Instagram

 

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

मनोरंजन विश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदे झी मराठीच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर पुनरागमन करतोय. झी मराठीच्या ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या सुपरहिट मालिकेत त्याने प्रार्थना बेहरेसोबत काम केलं होतं. यानंतर आता ‘चल भावा सिटीत’च्या निमित्ताने तो पुन्हा छोट्या पडद्यावर झळकणार आहे. त्यामुळे श्रेयसचे चाहते प्रचंड आनंदी झाले आहेत. या नव्या रिॲलिटी शोचा होस्ट म्हणून श्रेयस आपल्या व्यक्तिमत्त्वाने शोमध्ये रंग भरताना दिसणार आहे. या कार्यक्रमाचं भन्नाट शीर्षकगीत नुकतंच झी मराठीच्या ऑफिशिअल इंस्टाग्राम पेजवर रिलीज करण्यात आलं आहे. यातील श्रेयसची हुक स्टेप आणि श्रेयसचा लुक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय.

या शोमध्ये ग्रामीण आणि शहरी भागातील स्पर्धक एकत्र येणार असून स्पर्धकांना काही आव्हानांना सामोरे जावे लागेल. जिथे त्यांना आपल्यापेक्षा संपूर्णपणे वेगळं जीवन जगणाऱ्या व्यक्तींशी संवाद साधावा लागणार आहे. ग्रामीण आणि शहरी भागातले स्पर्धक एकमेकांच्या जीवनाचा अनुभव घेतील आणि त्यांना आव्हान देतील. ‘चल भावा सिटीत’ हा कार्यक्रम प्रेक्षकांना ग्रामीण महाराष्ट्राची समृद्धी आणि संस्कृती दर्शवेल. ‘सिटीत गाव गाजणार’ म्हणजे नक्की काय होणार? हे प्रेक्षकांना हळू हळू उलगडत जाईल. अशी एक अफलातून संकल्पना जिचा प्रेक्षकांनी विचार सुद्धा केला नसेल तो शो झी मराठी घेऊन येतेय. हा नवा कार्यक्रम 15 मार्च 2025 पासून दररोज रात्री 9.30 वाजता झी मराठीवर प्रसारित होणार आहे.

हेही पहा –

April May 99 Movie : उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची आठवण करून देणाऱ्या एप्रिल मे 99 चा टिझर रिलीज