घरमनोरंजनश्रेयस तळपदेच्या "बेबीफेस"ची सोशल मीडियावर चर्चा

श्रेयस तळपदेच्या “बेबीफेस”ची सोशल मीडियावर चर्चा

Subscribe

“आपडी थापडी” या चित्रपटातून मराठी चित्रपटात पुनरागमन करणाऱ्या अभिनेता श्रेयस तळपदेच्या बेबीफेसची सोशल मीडियात चर्चा आहे. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने श्रेयसने आपला चेहरा लहान मुलासारखा करत “आपडी थापडी” हे बडबडगीत म्हटलं आहे. “आपडी थापडी” हा चित्रपट 5 ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.

के सायलेंटच्या केसी पांडे यांची निर्मिती आणि प्रस्तुती असलेल्या ‘आपडी थापडी’ या चित्रपटाचं दिग्दर्शन आनंद करीर यांचं आहे. सुनीला करीर आणि आनंद करीर यांनी चित्रपटाचं लेखन केलं आहे. श्रेयस तळपदे आणि मुक्ता बर्वे यांच्यासह नंदू माधव, संदीप पाठक, नवीन प्रभाकर, खुशी हजारे अशी दमदार स्टारकास्ट या चित्रपटात आहे. तर सुमन साहू यांनी चित्रपटाचं छायांकन आहे. ‘फॅमिलीचा चित्रपट बघा फॅमिली बरोबर’ अशी टॅगलाईन असलेल्या या चित्रपटात पाटील कुटुंबाची एक मजेशीर गोष्ट उलगडणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shreyas Talpade (@shreyastalpade27)

- Advertisement -

“पैचान कौन”? या प्रश्नामुळे प्रसिद्ध झालेला विनोदवीर नवीन प्रभाकर आता एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांपुढे येत आहे. “आपडी थापडी” या चित्रपटात तो महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.याआधी अभिनेत्री मुक्ता बर्वे, संदीप पाठक, नवीन प्रभाकर आणि नंदू माधव यांच्याही बेबीफेसला उत्तम प्रतिसाद मिळाला.

या चित्रपटात अतिशय कंजुष स्वभाव असलेला सखाराम पाटील अर्थात श्रेयस तळपदे, त्याची पत्नी अर्थात मुक्ता बर्वे आणि त्यांची मुलगी असं पाटील कुटुंब या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. सखाराम पाटीलच्या कंजुषीची उदाहरणं चित्रपटाच्या टीजरमध्ये आपल्याला पाहता येतात. पण या बरोबरच या कथेला एक भावनिक किनार असल्यांचही टीजरमधून दिसतं. त्यामुळे टीजर पाहून पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपल्याला दसऱ्याची वाट पाहावी लागणार आहे. आता उत्सुकता आहे ती चित्रपटाच्या ट्रेलरची. ‘आपडी-थापडी’ ही एक मनोरंजक कथा सहकुटुंब चित्रपटगृहात पाहता येईल.

- Advertisement -

हेही वाचा :

‘आपडी थापडी’चा टीझर पाहिलात का? श्रेयस-मुक्ताचा अफलातून फॅमिली ड्रामा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -