Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन 'ताजा खबर' श्रिया पिळगावकर साकारणार सेक्स वर्करची भूमिका

‘ताजा खबर’ श्रिया पिळगावकर साकारणार सेक्स वर्करची भूमिका

Subscribe

मराठमोळे अभिनेते सचिन पिळगावकर यांची एकुलती एक लेक अभिनेत्री श्रिया पिळगावकरने आत्तापर्यंत बऱ्याच वेबसीरिजमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. यापूर्वी ‘गिल्टी माइंड्स’ आणि ‘द ब्रोकन न्यूज’ सारख्या वेबसीरिजमध्ये उत्तम भूमिका साकारल्यानंतर श्रिया आता तिच्या आगामी वेबसीरिजमध्ये सेक्स वर्करची भूमिका साकारताना दिसणार आहे. या वेबसीरिजचं नाव ताजा खबर असून ही वेबसीरिज डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.

दरम्यान, नुकताच या वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून येत्या 6 जानेवारीला ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. श्रिया पहिल्यांदा अशाप्रकारची भूमिका साकारत आहे. या वेबसीरिजमध्ये श्रियाच्या पात्राचे नाव मधु असून ती एक सेक्स वर्कर असते.

- Advertisement -

वेबसीरिजमध्ये असणार ‘हे’ कलाकार

श्रिया पिळगावकरसोबत या वेबसीरिजमध्ये भुवन बाम, प्रथमेश परब, देवेन भोजनी, नित्या माथुर, अतिशा नाईक, शिल्पा शुक्ला हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

- Advertisement -

2016 मध्ये केलं होतं बॉलिवूडमध्ये पदार्पण

श्रियाने 2016 मध्ये शाहरुखच्या फॅन चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने बरेच चित्रपट, वेवसीरिजमध्ये काम केले. ‘गिल्टी माइंड्स’,’द ब्रोकन न्यूज’,’मिर्जापुर’ यांसारख्या बऱ्याच वेबसीरिजमध्ये काम केले आहे.

 


हेही वाचा :

रोहित शेट्टी यांची ‘सर्कस’ रंगणार ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमात

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -