घरमनोरंजनदारुच्या व्यसनामुळे करियर धोक्यात आलं होतं - श्रुती हसन

दारुच्या व्यसनामुळे करियर धोक्यात आलं होतं – श्रुती हसन

Subscribe

बॉलिवूड आणि टॉलिवूडचे लोकप्रिय अभिनेते कमल हसन यांची कन्या अभिनेत्री श्रुती हसन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. एका चॅट शोमध्ये तिने आपल्या खासगी आयुष्यातील अनेक प्रकरणांबाबत संवाद साधला होता. मग तिचा इटलीचा बॉयफ्रेंड मायकल कोर्सेल सोबतचं ब्रेकअप, करियरमधील चढउतार आणि दारुच्या व्यसनामुळं झालेल्या नुकसानाबाबत श्रुतीने आपलं मन मोकळं केलं. दारूच्या व्यसनातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला बराच संघर्ष करावे लागल्याचेही श्रुतीने यावेळी सांगितले.

View this post on Instagram

?

A post shared by @ shrutzhaasan on

- Advertisement -

आपल्या व्यसनाबाबत बोलताना श्रुती म्हणाली की, ती व्हिस्किच्या चागंलीच आहारी गेली होती. जेव्हा तिने प्यायचे बंद केले होते, तेव्हा तिच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम झाला. दाऊ पिणं कायमचं बंद केल्यानंतर काही काळाने तिला आयुष्यात नवा बदल होतोय, हे जाणवू लागलं. मात्र या प्रक्रियेदरम्यान तिला चांगलाच संघर्षही करावा लागला होता. दारूला रामराम ठोकल्यानंतर तिची तब्येत खराब व्हायची. मात्र या परिस्थितीतही तिने ही गोष्ट मित्रपरिवार आणि घरच्यांपासून लपवून ठेवली होती. योग्य उपचार घेऊन यातून बाहेर येण्याचा तिचा आटापिटा सुरु होता.

- Advertisement -

या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी श्रुतीला तब्बल एक वर्षाचा काळ लागला. या काळात ती चित्रपटांपासून दूर राहिली. याबद्दल ती सांगते की, लोक माझ्या व्यायसायिक करियरबाबत काय बोलतील याचा मी कधीही विचार केला नाही. मुळात लोक काय म्हणतात? याचा विचारच मी करत नाही. तसंही त्याच त्याच प्रकारच्या भूमिका वठवून मला कंटाळा आला होता, नवीन काहीतरी करण्यासाठी मला ब्रेक हवा होता.

मायकल कोर्सेलसोबत ब्रेकअप केल्याबद्दलही तिने या चॅट शोमध्ये खुलासा केला. मी एक साधी मुलगी असल्यामुळे प्रत्येकजण माझ्यावर हुकुमत गाजवण्याचा प्रयत्न करतो. कोर्सेलसोबतचं ब्रेकअप मला बरंच काही शिकवून गेलं असल्याचंही श्रुतीने यावेळी नमुद केलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -