घरताज्या घडामोडीSushant Sucide Case: रियाची मॅनेजर श्रृती मोदीची ED कडून ८ तास चौकशी

Sushant Sucide Case: रियाची मॅनेजर श्रृती मोदीची ED कडून ८ तास चौकशी

Subscribe

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी आज, शुक्रवारी रिया चक्रवर्तीला ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स पाठवण्यात आले होते. रिया ईडी कार्यालयात दाखल झाली. त्याचबरोबर रियाची मॅनेजर श्रृती मोदीचीही ईडी कडून चौकशी करण्यात आली. तब्बल ८ तासानंतर मॅनेजर श्रृती मोदीची चौकशी संपली आहे. मात्र नेमकं या आठ तासात काय घडलं याची माहिती अद्याप मिळालेली नाहीये.

- Advertisement -

सुशांतची केस मनी लॉण्डिगशी जोडली गेली असल्यामुळे ईडीने रियाला विचारण्यासाठी प्रश्नांची एक यादीच तयार केली होती. यावेळी रियासोबत तिचा भाऊ आणि वडिलदेखील उपस्थित आहेत.

सकाळी रियाने तिच्या वकिलांमार्फत ईडीची चौकशी पुढे ढकलण्याची मागणी केली होती. सुप्रिम कोर्टातील सुनावणीचा निर्णय येईपर्यंत ही चौकशी पुढे ढकलण्यात यावी, अशी विनंती तिने केली होती. परंतू ईडीने तिची ही मागणी फेटाळली. सीबीआयने गुरूवारी या प्रकरणी एफआयआर दाखल केली होती. ज्यामध्ये रियासह ६ लोकांना आरोपी ठरवण्यात आले आहे. चौकशीसाठी सीबीआयने (SIT) एसआयटीची नेमणूक केली आहे. ही टीम गुजरातचे केडर आयपीएस मनोज शशिधर यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. रियाशी तिच्या मालमत्तेसंबंधी तसेच सुशांतसोबत झालेल्या व्यवहारासंबंधी प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -